Coronavirus : तरुणांपेक्षा वृद्ध रुग्णांच्या जीवाला अधिक धोका; कोरोनामुळे श्वसनसंस्थेतील एन्झाइमच्या स्वरूपात होतात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:30 AM2020-03-25T01:30:51+5:302020-03-25T05:35:09+5:30

coronavirus : अमेरिकेतील लुईसिआना विद्यापीठातील संशोधक जेम्स दिआज यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलून फुप्फुसात प्रवेश करतो.

Coronavirus: greater risk of survival of older patients than young; Corona changes in the form of the enzyme in the respiratory system | Coronavirus : तरुणांपेक्षा वृद्ध रुग्णांच्या जीवाला अधिक धोका; कोरोनामुळे श्वसनसंस्थेतील एन्झाइमच्या स्वरूपात होतात बदल

Coronavirus : तरुणांपेक्षा वृद्ध रुग्णांच्या जीवाला अधिक धोका; कोरोनामुळे श्वसनसंस्थेतील एन्झाइमच्या स्वरूपात होतात बदल

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांच्या जीवाला अधिक धोका का संभवतो, याचे उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
कोरोना विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलत असल्यामुळे फुप्फुसांच्या क्रियेतही गुंतागुंत होते. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंडाचे गंभीर आजार असलेल्या आणि ६० वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी कोरोना संसर्ग जीवघेणा ठरतो असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
ट्रॅव्हल मेडिसिन या नियतकालिकामध्ये संशोधकांनी एक लेख लिहिला आहे. अमेरिकेतील लुईसिआना विद्यापीठातील संशोधक जेम्स दिआज यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलून फुप्फुसात प्रवेश करतो. त्यामुळे त्या रुग्णाला न्यूमोनिया होतो. त्यामुळे श्वसनक्रियेत मोठा बिघाड होतो.
अशा रुग्णाचा कोरोना संसर्ग झाल्यापासून १० ते १४ दिवसांत मृत्यू ओढवू शकतो. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे विकार असलेल्यांना अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर्स (एसीईआय), अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स (एआरबी) पद्धतीची औषधे रोज घ्यावी लागतात. अशा रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये एसीई२च्या रिसेप्टरची संख्या वाढलेली असते. कोरोना विषाणूची बाधा होताच अशा व्यक्तींच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊन ती दगावण्याचा धोका असतो.


चीनमधील उदाहरणे
चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांपैकी १०९९ जणांची ११ डिसेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या काळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विषाणूची लागण झालेल्यांपैकी जे मरण पावले, त्यामध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यामुळे १० वर्षांखालील मुले व ६० वर्षांवरील वृद्धांनी महत्त्वाचे काम नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना व विविध देशांच्या सरकारे करीत आहेत.

Web Title: Coronavirus: greater risk of survival of older patients than young; Corona changes in the form of the enzyme in the respiratory system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.