Coronavirus: कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांना मोठं पॅकेज; मोदी सरकारनं दिले १५ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 08:45 PM2020-04-09T20:45:44+5:302020-04-09T20:47:08+5:30

केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे.

Coronavirus: Government of India sanctions Rs. 15,000 crores for 'India #COVID19 Emergency Response and Health System Preparedness Package vrd | Coronavirus: कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांना मोठं पॅकेज; मोदी सरकारनं दिले १५ हजार कोटी

Coronavirus: कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांना मोठं पॅकेज; मोदी सरकारनं दिले १५ हजार कोटी

Next

नवी दिल्लीः कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी दिला आहे. कोरोना इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम पॅकेजअंतर्गत थोडा थोडका नव्हे, तर तब्बल १५ हजार कोटींचा निधी मोदी सरकारनं राज्यांमध्ये वितरीत केला आहे. राज्य आरोग्य यंत्रणा सुधारणाच्या उद्देशाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा संपूर्ण निधी देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधील खर्चासाठीची संपूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

सरकारने दिलेल्या पॅकेजशी संबंधित 5 महत्त्वाच्या गोष्टी

(I) राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक वंदना गुरुनानी यांनी एक परिपत्रक जारी केले आहे की, जानेवारी २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत शंभर टक्के केंद्रीय प्रकल्प टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे.
(II) या प्रकल्पांतर्गत कोरोनाबाधित लोकांमधल्या विषाणूला रोखून राष्ट्रीय व राज्यस्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. यात वैद्यकीय उपकरणे, औषधे, इमारत प्रयोगशाळेची खरेदी आणि जैव-सुरक्षा सज्जता याला मजबूत करणे देखील समाविष्ट आहे.


(III) हे परिपत्रक देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसह आरोग्य आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. ज्यात निधी त्वरित मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. 
(IV) पहिल्या टप्प्यात राबविल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालय वाढविणे आणि इतर रुग्णालये विकसित करणे. तसेच वेगळ्या खोल्या, व्हेंटिलेटरसह आयसीयू, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयांमधील लॅब दुरुस्त करणं इत्यादींचा समावेश आहे. 
(V) पहिल्या टप्प्यात लॅब व रुग्णवाहिकांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. अहवालानुसार, केंद्रीय पॅकेज राज्यातील सुरक्षा उपकरणे (पीपीई), एन 95 मास्क आणि व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी दिलं जाणार आहे. ज्याचा भारत सरकारकडून खरेदी व पुरवठा केला जात आहे.

Web Title: Coronavirus: Government of India sanctions Rs. 15,000 crores for 'India #COVID19 Emergency Response and Health System Preparedness Package vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.