Coronavirus: लस सर्वांना देणार, असं सरकारनं म्हटलंच नाही; केंद्रीय आरोग्य सचिवांचे कानावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 02:59 AM2020-12-02T02:59:00+5:302020-12-02T07:21:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नुकताच अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा धावता दौरा केला.

Coronavirus: The government did not say that the vaccine will be given to everyone; Hands on the ears of the Union Health Secretary | Coronavirus: लस सर्वांना देणार, असं सरकारनं म्हटलंच नाही; केंद्रीय आरोग्य सचिवांचे कानावर हात

Coronavirus: लस सर्वांना देणार, असं सरकारनं म्हटलंच नाही; केंद्रीय आरोग्य सचिवांचे कानावर हात

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला वेसण घालणाऱ्या लसीच्या उपलब्धतेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतातही लसीवर संशोधन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसनिर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच तीन शहरांचा धावता दौराही केला. कोरोना प्रतिबंधक लस प्राप्त करण्यासाठी हे असे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य सचिवांनी मात्र ‘कोरोनाची लस सर्व देशवासीयांना दिली जाईल, असे केंद्राने कधीही म्हटलेले नाही’, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नुकताच अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा धावता दौरा केला. तसेच देशभर लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्राने पूर्वतयारीही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना देशात लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल, असे विचारले असता ‘संपूर्ण देशाचे लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने कधीही म्हटलेले नाही’, असे स्पष्ट केले. 

आयसीएमआरची सारवासारव
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, लसीच्या परिणामकारकतेवर लसीकरण अवलंबून असेल. कोरोनाचा प्रसार करणारी साखळी तोडणे, हे आमचे प्रथम उद्दिष्ट असेल. कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस देऊन कोरोनाची साखळी आम्ही तोडली तर संपूर्ण देशवासीयांना लस टोचण्याची काही गरजच उरणार नाही, असे सांगत भार्गव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  

सगळ्या देशात लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने कधीही म्हटलेले नाही. अशा शास्त्रीय मुद्द्यांवर केवळ वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारावरच चर्चा होणे महत्त्वाचे आहे. - राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव.

Web Title: Coronavirus: The government did not say that the vaccine will be given to everyone; Hands on the ears of the Union Health Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.