शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:28 PM

त्यांना बाइकवरून उतरवून कोंबड्यासारखं बसण्यास भाग पाडण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास सांगण्यात आलं.

गोपाळगंजः देशभरात लॉकडाऊन असतानाही अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांच्या कडक बंदोबस्तालाही ही मंडळी जुमानत नाही. मग त्यांना बऱ्याचदा पोलिसी हिसका दाखवला जातो. परंतु लॉकडाऊनदरम्यान पोलिसांचा निष्ठुरपणाही समोर येतो आहे. लॉकडाऊनच्या काळात दोन जखमींना बाईकवरून रुग्णालयात नेणाऱ्या बाइकस्वाराला अडवण्यात आलं. तसेच त्यांना बाइकवरून उतरवून कोंबड्यासारखं बसण्यास भाग पाडण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास सांगण्यात आलं. त्याचदरम्यान पीडित मुलं पोलिसांकडे याचना करत होती. रुग्णालयात जाऊ देण्याची विनवणी करत होते. परंतु पोलिसांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. बिहारमधल्या गोपाळगंज भागात हे प्रकरण घडलं असून, लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात होता बाइकस्वारसोमवारी बंजारी गावातून बाइकवर बसून तीन जण बंजारी चौकात पोहोचले. एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झालेली होती. त्याच्या डोक्याला बँडेज लावण्यात आलं होतं आणि त्या बँडेजवर रक्ताचे डागही दिसत होते. तर दुसऱ्या तरुणाच्या अंगठ्याला मार लागला होता. अंगठ्याला मोठी जखम झाल्यानं तीसुद्धा बँडेजनं बांधण्यात आली होती. त्यांना नीट उभंसुद्धा राहता येत नव्हतं. तर बाइक चालवणारी व्यक्ती सृदृढ होती. तिन्ही तरुण बंजारी चौकात पोहोचल्यानंतर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी बाइकवरून तिघांना उतरवलं. त्यानंतर त्यांना कोंबड्यासारखं बसण्यास सांगण्यात आलं. कोंबड्यासारखं बसण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास भाग पाडलं. अंगठ्याला दुखापत झाली असल्यानं तरुणाला चालताही येत नव्हतं. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कडक नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी गोपाळगंजमधील विविध चौक आणि रस्त्यांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमध्ये रुग्ण व रुग्णालयात जाणाऱ्या लोकांना सूट देण्यात आली आहे. लोक त्यांच्या दैनंदिन गरजा व बँकेशी संबंधित कामांसाठी, तसेच खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. मात्र, तिन्ही तरुणांना शिक्षा दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. दुखापतग्रस्त तरुणांनी पोलिसांना सोडण्याची विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे गोपाळगंज परिसरातून या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार