- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळे उत्तर प्रदेशमधील कुटीरोद्योगांपुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. गांधी यांनी आदित्यनाथ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्याच्या लोकसंख्येचा मोठा भाग हा विणकर, हस्तकौशल्ये व छोट्या उद्योगांत आहे. खाली आहेत. मागणी आणि पुरवठा पूर्णपणे बंद आहे.मालक-कामगार संबंधही मोठ्या संकटातून जात आहेत. या पार्श्वभूमीवर घरांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जाचे हप्ते सहा महिने पुढे स्थगित करावेत. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या खरेदीची पूर्ण हमी दिली जावी. वीज बिल माफ करावे, आशा, शिक्षणमित्र, अंगणवाडी कार्यकर्ते आदींना प्रोत्साहन रक्कम देण्याची व्यवस्था सरकारने करावी, विणकर, दस्तकारांना दरमहा १२ हजार रुपये बेरोजगारीमुळे भरपाई भत्ता दिला जावा, शेतीसाठीच्या कर्जावरील व्याज चार महिने माफ केले जावे, कर्जफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिली गेलेली आरसी तात्काळ थांबवावी, असे प्रियांका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
coronavirus: उत्तर प्रदेशमध्ये कुटीरोद्योगांना आर्थिक मदत द्या -प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:04 IST