coronavirus: लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, मोदींचे आवाहन

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 06:35 PM2020-10-20T18:35:37+5:302020-10-20T18:54:37+5:30

Narendra Modi : लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.

coronavirus: Fight against coronavirus must continue till vaccination, says Narendra Modi | coronavirus: लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, मोदींचे आवाहन

coronavirus: लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, मोदींचे आवाहन

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजेकोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेलदेशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणिय घट होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात बेफिकिरी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.

देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. हल्लीच असे काही फोटो आणि व्हिडिओ दिसून आलेत. ज्यामध्ये लोक पुरेशी काळजी घेताना दिसत नाही आहेत. ही बाब योग्य नाही. काही बेजबाबदार लोक स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे.  अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्यानंतर अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. 



लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.  

Web Title: coronavirus: Fight against coronavirus must continue till vaccination, says Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.