Corona मुळे वाढल्या कोरौना गावाच्या अडचणी; नाव ऐकताच गावकऱ्यांपासून दूर पळतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:24 AM2020-03-30T09:24:10+5:302020-03-30T09:25:34+5:30

रामजी दीक्षित म्हणाले की, आम्ही जेव्हा कोणाला फोन करतो आणि सांगतो की, आम्ही कोरौना येथून बोलतोय, त्यावेळी लोक फोन कट करतात. त्यांना वाटतं की, आम्ही त्यांची चेष्टा करतोय.

coronavirus due to coivd 19 residents of korauna village facing discrimination | Corona मुळे वाढल्या कोरौना गावाच्या अडचणी; नाव ऐकताच गावकऱ्यांपासून दूर पळतात लोक

Corona मुळे वाढल्या कोरौना गावाच्या अडचणी; नाव ऐकताच गावकऱ्यांपासून दूर पळतात लोक

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस या महामारीची जगभरात दहशत पसरली आहे. आतापर्यंत कोरोनाने ३० हजारहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर लाखो लोक कोरोना बाधित आहेत. कोरोना व्हायरसमुळे उत्तर प्रदेशातील एका गावाला नाहकच अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेही कोरोनाची लागण झाल्यामुळे नव्हे तर गावाच्या नावात साधार्म्य असल्यामुळे या गावचे गावकरी हैराण झाले आहे.

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका गावाचे नाव कोरोना या नावाशी मिळते-जुळते आहे. या गावाचे नाव कोरौना आहे. यामुळे या गावातील गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. हा व्हायरस पसरल्यापासून आमच्यासोबत भेदभाव करण्यात येत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.

कोरौना गावात राहणाऱ्या राजन नावाच्या व्यक्तीने सांगितले की, आमच्या गावात येण्यास कोणीही तयार नाही. जेव्हा आम्ही सांगतो की, आम्ही कोरौना गावाचे आहोत, त्यानंतर लोक आमच्यापासून दूर पळतात. त्यांना हे कळत नाही की, कोरौना हे केवळ गावाचे नाव आहे. आमच्या गावात आतापर्यंत कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचेही राजन यांनी सांगितले.

गावाचे नाव ऐकले तर काही लोक फोनवर बोलण्यासाठी देखील घाबरत आहेत. गावात राहणाऱ्या सुनीलने सांगितले की, जेव्हा आम्ही कुठं बाहेर निघतो तेव्हा पोलिस विचारतात कुठं जात आहात,  त्यावर आम्ही सांगतो, कोरौनाला जातोय. अशावेळी पोलिस देखील अस्वस्थ होतात. आता आमच्या गावाचं नावच कोरौना आहे, त्यात आम्ही काय करू शकतो, अस सवालही सुनीलने उपस्थित केला.

रामजी दीक्षित म्हणाले की, आम्ही जेव्हा कोणाला फोन करतो आणि सांगतो की, आम्ही कोरौना येथून बोलतोय, त्यावेळी लोक फोन कट करतात. त्यांना वाटतं की, आम्ही त्यांची चेष्टा करतोय. कोरोना व्हायरसमुळे देशभरात तीन आठवड्यांसाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. तर हजारहून अधिक लोक बाधित झाले आहेत.

Web Title: coronavirus due to coivd 19 residents of korauna village facing discrimination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.