CoronaVirus News: मोठी बातमी! २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:24 PM2020-05-20T17:24:37+5:302020-05-20T17:39:39+5:30

नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची ट्विटरद्वारे माहिती

coronavirus Domestic Flights To Resume From 25th may In Calibrated Manner kkg | CoronaVirus News: मोठी बातमी! २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार

CoronaVirus News: मोठी बातमी! २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार

Next

नवी दिल्ली: देशभरातील विमानसेवा २५ मेपासून सुरू केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 



सोमवारपासून (२५ मे) देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री यांनी ट्विटरवर दिली. याबद्दल सर्व विमानतळांना सूचना दिल्या जात आहेत. हवाई वाहतूक सुरू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारांचीदेखील असल्याचं ट्विट पुरी यांनी मंगळवारी केलं होतं. राज्य सरकारांनादेखील यासाठी तयारी करावी लागले, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं. 

२५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून विमान उड्डाणं बंद आहेत. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून तो ३१ मे रोजी संपेल. देशातील वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकारकडून टप्प्याटप्प्यानं सुरू आहेत. देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेनं कालच दिली आहे.

ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणार

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त

'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा

Read in English

Web Title: coronavirus Domestic Flights To Resume From 25th may In Calibrated Manner kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.