शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

CoronaVirus News: आधे इधर, आधे उधर; पंतप्रधान मोदींच्या महापॅकेजवरून काँग्रेसमध्ये 'शोले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 10:06 IST

CoronaVirus News: काही नेत्यांंकडून पॅकेजचं स्वागत; काहींकडून टीका

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशाला मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज असल्याचं म्हटलं जात होतं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेजमध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. या पॅकेजमुळे भारत स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं दिसून आलं आहे. देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदींच्या पॅकेजचं स्वागत केलं. 'मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची बरीच प्रतीक्षा होती. देर आए दुरुस्त आए. आम्ही याचं स्वागत करतो. याबद्दलचा तपशील समजल्यानंतर कोणत्या क्षेत्रांना किती लाभ मिळेल ते कळू शकेल,' असं गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागत केलं आहे. 'मोदींनी योग्य वेळी २६६ बिलियन अमेरिकन डॉलरचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. याची योग्य अंमलबजावणी झाल्यास निर्माण झालेल्या संकटावर मात करता येईल. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारत प्रमुख भूमिका बजावेल. याशिवाय मेक इन इंडियाची क्षमतादेखील वाढेल,' असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र मोदींच्या पॅकेजवरून कडाडून टीका केली आहे. 'माननीय मोदीजी, तुम्ही देशाला संबोधित करून माध्यमांना हेडलाईन तर दिलीत, पण देशाला मदतीच्या हेल्पलाईनची प्रतीक्षा आहे. आश्वासनं प्रत्यक्षात येण्याची वाट पाहायला हवी,' अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदींवर टीका केली. 'घरवापसी करत असलेल्या लाखो प्रवासी मजुरांना दिलासा देण्याची, त्यांच्या जखमांना मलम लावण्याची, त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. तुम्ही याबद्दलची घोषणा कराल अशी अपेक्षा होती,' असं सुरजेवालांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका केली. 'मोदींचं पॅकेज म्हणजे हेडलाईन हंटिंग आहे. त्यांनी २० लाख कोटींचा आकडा जाहीर केला. पण काहीच तपशील दिला नाही,' अशा शब्दांत तिवारींनी आर्थिक पॅकेजवरुन मोदींना लक्ष्य केलं. 

मोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश? …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस