शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 14:16 IST

Coronavirus In Delhi : दिल्लीत ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. केंद्राला कमी ऑक्सिजनसाठी पत्र लिहिल्याची माहिती.

ठळक मुद्दे दिल्लीत ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहितीकेंद्राला कमी ऑक्सिजनसाठी पत्र लिहिल्याची माहिती.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. परंतु काही दिवसांपासून देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या कमी होतानाही दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र, दिल्ली यांसारख्या भागांना मोठा फटका बसला होता. परंतु आता त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली. तसंच दिल्लीतील ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं."दिल्लीला दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आता कमी होऊन ५८२ मेट्रिक टन इतकी झाली आहे. आम्ही केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे. तसंच आता आमचं काम दररोज ५८२ मेट्रिक टन ऑक्सिजनमध्ये चालेल असं त्यांना कळवण्यात आलं आहे. आमच्या कोट्याच्या अतिरिक्त ऑक्सिजन अन्य राज्यांना देण्यात यावा असंही सांगण्यात आलं आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत फार कमी प्रमाणात ऑक्सिजनच्या इमर्जन्सीसाठी फोन येत आहेत," असं सिसोदिया म्हणाले.  "सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले होते. परंतु केंद्र सरकारनं केवळ एकदाच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला होता," असंही त्यांनी सांगितलं. १५ दिवसांपूर्वी दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर ३५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला होता. परंतु आता तो १४ टक्क्यांवर आला आहे. नवे रुग्ण १०,४०० च्या जवळपास आहेत. रुग्णालयांतील बेड्सही रिकामे होऊ लागल्याचं सिसोदिया यांनी नमूद केलं. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHealthआरोग्यOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल