coronavirus: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:00 IST2020-06-17T19:52:05+5:302020-06-17T20:00:40+5:30

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

coronavirus: Delhi Health Minister Satyendra Jain infected with coronavirus | coronavirus: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग

coronavirus: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली - दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची काल केलेली कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती. 

 

दरम्यान, दिल्लीत वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गा्च्या पार्श्वभूमीवर सत्येंद्र जैन हे आघाडीवर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते सतत बैठकांना उपस्थित राहत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीलासुद्धा सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, त्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.

Web Title: coronavirus: Delhi Health Minister Satyendra Jain infected with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.