शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

Coronavirus: रॅपिड टेस्टिंग कीट्सच्या आयातीला ‘आयसीएमआर’कडून विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:52 IST

मंत्री गट एक फेब्रुवारीला स्थापन; २४ मार्चपर्यंत निर्णयच झाला नाही; कीटस्ची मागणी वाढताच अधिकाऱ्यांची धावपळ

नवी दिल्ली : घातक ठरलेल्या कोरोना विषाणूबाबत (कोविड-१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांचा गट एक फेब्रुवारी रोजी स्थापन केला; परंतु भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग कीटस्ची आॅर्डर देण्याचा २४ मार्चपर्यंत काही निर्णयच घेतला नाही.उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, चाचण्या आणि आयातीला परवानगी देण्यासाठी आयसीएमआर ही उच्चाधिकार असलेली नोडल यंत्रणा आहे. तिने रॅपिड अँटीबॉडी टेस्टींग किटसच्या खरेदीसाठी आॅर्डर दिली नाही. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसमुळे कोविड-१९ चा विषाणू अस्तित्वात आहे की नाही हे ३० मिनिटांत समजते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्ये आणि इतर आरोग्य संस्थांनी वारंवार विनंती करूनही आयसीएमआरने या किटसचे निष्कर्ष हे अंतिम नाहीत, असे सांगून आपली भूमिका सौम्य केली नाही. आयसीएमआरने आरटी-पीसीआर ही कोविड-१९ साठी फक्त दुजोरा देणारी चाचणी आहे, असाच आग्रह लावून धरलेला आहे. जेव्हा विषाणू देशभर पसरला व त्याच्या फैलावाचा वेग आयसीएमआर व तिच्या तज्ज्ञांनाही अपेक्षित नव्हता तेव्हा आयसीएमआरने धोक्याची घंटा वाजवली. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसच्या आयातीसाठीची पहिली निविदा २४ मार्च रोजी जारी करण्यात आली आणि २८ मार्च रोजी निविदा बंद झाल्या. अनेक निविदाधारकांना यात सामावून घेऊन आॅडर्स दिली गेली. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसची मागणी वाढताच भारतीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आयसीएमआरचे प्रवक्ते या किटस पाच एप्रिल रोजी येणार असल्याचे सांगतच होते. त्यानंतर ती तारीख ८, १२ आणि शेवटी १७ एप्रिल अशी सांगितली.आणखी ४५ लाख कीटस्ची आॅर्डर21 एप्रिल रोजी राज्यांकडे आयसीएमआरने चाचण्या करण्यासाठी कीटस् पाठवल्या. अशा पाच लाख किटस आल्यावर आयसीएमआरने आणखी ४५ लाख कीटस्साठी इतर देशांकडे १४ एप्रिल रोजी आॅडर्स दिली. रॅपिड टेस्टिंग कीटस् हे हॉटस्पॉटसमध्ये विषाणू शोधण्यासाठी आणि देखरेख ठेवण्याच्या उद्देशासाठी फारच उपयुक्त आहेत.कोविड-१९ विरोधातील युद्धात सरकारी यंत्रणेने केलेली ही दुसरी मोठी चूक आहे.पहिली चूक होती ती सरकारने लाखांच्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तपासणी न करताच येऊ दिले आणि ‘होम क्वारंटाईन्ड’ प्रवाशांचा शोध न घेणे. धक्कादायक म्हणजे आता रॅपिड टेस्टिंग कीटस् सदोष आढळल्या असून दोन दिवस चाचण्या थांबवल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या