शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Coronavirus: दुबईहून परतला, पार्ट्या केल्या, मॉल्समध्ये गेला; नंतर कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:05 PM

Coronavirus कोरोनाबाधित व्यक्ती शेकडो व्यक्तींच्या संपर्कात आल्याची भीती

विशाखापट्टणम: कोरोनाबाधित देशांमधून येणाऱ्यांना कॉरेंटाईन होण्याचे आदेश दिले असताना अनेक जण याचं उल्लंघन करताना दिसत आहेत. तेलंगणात कोरोनाचा एक रुग्ण निर्धास्तपणे फिरत असल्याचं समोर आल्यानं यंत्रणांची धाकधूक वाढलीय. आखाती देशांमधून विशाखापट्टणमला परतलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं तपासणीतून समोर आलंय. ही व्यक्ती घरात न थांबता अनेक ठिकाणी फिरल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय. आखाती देशातून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ही सूचना अमान्य करून त्यानं कुटुंबीयांच्या भेटीगाठी घेतल्या. याशिवाय तो काही पार्ट्यांना गेला. कोरोनाची बाधा झालेली ही व्यक्ती त्यानंतर शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्समध्येही गेली. हैदराबाद आणि विशाखापट्टणम अशा दोन शहरांमध्ये या व्यक्तीनं मुक्तसंचार केल्यानं प्रशासकीय यंत्रणांची झोप उडालीय. ही व्यक्ती नेमकी किती जणांच्या संपर्कात आली, याचा शोध सध्या यंत्रणेकडून घेतला जातोय. लंडनहून हैदराबादला परतलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती तेलंगणातल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. क्षयरोग रुग्णालयात या तरुणाची चाचणी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं जनआरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी दिली. या तरुणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं तेलंगणातल्या कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहोचलीय.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या