शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

coronavirus: देशात कोरोनाचा फैलाव धोकादायक पातळीवर, चिंता व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:02 IST

coronavirus In India : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या देशातील फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus In India) महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच  पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील विविध आरोग्य सेवांचा दौरा करून कोरोनावरील पुढील रणनीती बाबत डॉक्टरांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. (Coronavirus spread in India at dangerous level, the health minister Dr. Harshvardhan expressing concern & made a big statement) हर्षवर्धन यांनी आज एम्सचा दौरा केला. यावेळी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि रुग्णालयातील अन्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशभरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही विविध रुग्णालयांचा दौरा करत आहोत. तसेच पुढील तयारीसाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमसोबत चर्चाही करत आहोत. तुम्हाला माहिती असेलच की गेल्यावर्षी कोरोनाविरोधात लढाईला सुरुवात झाली होती तेव्हा प्रत्येक बाबतीत उणिवा दिसून येत होत्या. मात्र आम्ही अनुभवामधून खूप काही शिकलो आहोत. तसेच आमचा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला आहे. 

२०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र २०२१ मध्ये आमच्या डॉक्टरांकडे कोरोनाविरोधात लढण्याचा अनुभव अनेक पटींनी अधिक आहे. देशात केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. देशतील कुठल्याही रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सची टंचाई होऊ दिली जाणार नाही. आतापर्यंत कुठल्याही राज्याने आमच्याकडे व्हेंटिलेटर्स ची मागणी केलेली नाही. बहुतांश राज्यांनी केंद्राकडून पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचासुद्धा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागा नाही, अशी माहितीही हर्शवर्धन यांनी दिली.  दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनोचे २ लाख १७ हजार ३५३ रुग्ण सापडले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर दिवसभरात ११८५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत तब्बल १ लाख १८ जार ३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य