शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus : कोरोना व्हायरसचा जन्मदाता कोण?; चीन अन् अमेरिकेत वाकयुद्धाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 3:38 PM

अमेरिकेनं चीन आणि डब्ल्यूएचओवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. भारतीय वैज्ञानिकांनीही चीननं माहिती लपवण्याचा संशय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर २०१९मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. कोरोनाचा जन्मदाता कोण? हा प्रश्न आता अख्ख्या जगाला पडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन अन् अमेरिकेमध्ये जोरदार वाक्युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेनं चीन आणि डब्ल्यूएचओवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रकोप पूर्ण जगाला सहन करावा लागतो आहे. सप्टेंबर २०१९मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यातच कोरोनाचा जन्मदाता कोण? हा प्रश्न आता अख्ख्या जगाला पडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन अन् अमेरिकेमध्ये जोरदार वाक्युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेनं चीन आणि डब्ल्यूएचओवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. भारतीय वैज्ञानिकांनीही चीननं माहिती लपवण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर चीननंही अमेरिकेच्या आरोपांचं खंडन केलं असून, स्पष्टीकरण दिलेलं आहे.कोरोनामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला असून, चीनला आता त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. भारतातले चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनवर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. आमच्याकडे १५५१ कोरोना संक्रमित असे रुग्णं आढळले आहेत की, ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती, असंही त्यांनी सांगितलं आहे. खरंतर अमेरिकेसह जगभरातले अनेक देश चीननं कोरोनासंबंधीची माहिती दडवल्याचं समजत आहेत. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस लोकांमध्ये पसरत चालला आहे. युरोप, अमेरिका आणि इस्राएल सर्वच देश कोरोनानं हैराण युरोपातील सर्वच देश, अमेरिका, इस्राएलसह अनेक देशांना कोरोना विषाणूंच्या जन्मदाता कोण हे जाणून घ्यायचं आहे. देशातील सर्वच देशांचा सर्वाधिक संशय चीनवर आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाची सुरुवात झाली आहे. संक्रमण वाढल्यानंतर चीननं वुहान शहर लॉकडाऊन केलं होतं. आता वुहानमधली परिस्थिती सामान्य झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक सुरू झाली असून, औद्योगिक कंपन्यांनीही कामकाज सुरू केले आहे. दुसरीकडे जगातील देशांमध्ये लॉकडाऊन चालू आहे.कोरोनाला जैविक हल्ल्यासाठी चीननं विकसित तर नाही ना केलं?जैविक किंवा रासायनिक हल्ल्यासाठी हा विषाणू विकसित केलेला असल्यास त्यात कोणतीही नवी गोष्ट नाही. जगातील अनेक देशांकडे जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रं आहेत. डीआरडीओच्या एका माजी वैज्ञानिकांनुसार अनेक देशांजवळ जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रांपासून बचाव करण्याची साधनं तयार आहेत. कोरोना हे एक जैविक हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेलं शस्त्रास्त्र असल्याचा अनेक देशांचा समज आहे. या जीवाणूला विकसित केले जात असतानाच चाचणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यानं प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकांनाच याचं संक्रमण झालं. संक्रमित वैज्ञानिकांच्या माध्यमातून हा जीवाणू प्रयोगशाळेच्या बाहेर आला आणि जगभरात पसरला. वटवाघळापासून हा व्हायरस तयार झाल्याचीही एक शक्यता वर्तवण्यात  येत आहे. त्यामुळेच कोरोनाच जन्म कसा झाला, याचा शोध आता सर्व देश मिळून घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन