शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 8:50 AM

 कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

ठळक मुद्देशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार जगालाही दिलासा मिळू शकतो. उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं आहे.  कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत.उन्हाळ्यात तापमानाचा पारा आणखी चढणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगातले विकसित देशही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमेरिका, इटली, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचदरम्यान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार जगालाही दिलासा मिळू शकतो. उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं आहे.  कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, थंडी जाईल आणि वातावरणात बदल होईल. उन्हाळ्यात तापमानाचा पारा आणखी चढणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे. भारतात तापमानाचा पारा खाली असला तरी लवकरच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीनंही भारतात सकारात्मक बदल दिसेल, अशी आशा व्यक्त केली आहे.एमआयटीच्या अहवालातून भारताला दिलासा या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार जर हवामान उष्मा आणि आर्द्रतेने भरलेले असेल तर कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी होईल. ज्या देशात तापमान ३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान आहे आणि आर्द्रता प्रति घनमीटर ४ ते ९ ग्रॅम आहे, तेथे कोरोना विषाणूचे ९० टक्के रुग्णं आढळले आहेत. ज्या देशांमध्ये पारा १८ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होता आणि आर्द्रता प्रति घनमीटरपेक्षा ९ ग्रॅमपेक्षा जास्त होती, तिकडे ६ टक्केच रुग्ण आढळले आहेत. एमआयटीचा हा अहवाल दिलासा देणारा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत भारतातील तापमानात वाढ होणार आहे.स्वतः अमेरिकेनं दोन क्षेत्रांमधील फरक केला अधोरेखितअमेरिकेतच अभ्यासाअंती उष्ण आणि थंड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगवेगळा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या उत्तरी राज्यांत, थंडी अधिक आहे, तिथे कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.  दक्षिणेकडील राज्य थोडी उष्ण असल्यानं उत्तरी राज्यांच्या तुलनेत इथे कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. या संशोधनात असेही म्हटले आहे, की भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव उबदार हवामानामुळे खाली आला आहे. चीन, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत हे देश दाट लोकवस्तीचे आहेत आणि आरोग्य सुविधा बरीच कमकुवत आहे. जेव्हा भारतातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी कोरोना रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली. आपल्याला सामाजिक अंतर ठेवावे (सामाजिक डिटेनिंग) लागेल, असंही मोदींनी अधोरेखित केलं आहे. कारण सोयीसुविधा असलेले विकसित देशसुद्धा याविरुद्ध काहीही करू शकले नाहीत.उष्णता भारतासाठी ठरणार निर्णायकभारत आणि अमेरिकेच्या सर्व देशांमध्ये कोरोनानं जो काही धुमाकूळ घातलेला आहे. त्यातही भारताला दिलासा देणाऱ्या घटना घडत आहेत. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचे प्रमाणही कमी आहे आणि मृतांचा आकडादेखील कमी आहे, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. अशा परिस्थितीत एमआयटीचा अहवाल बाहेर आल्यानं भारताला हा मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळा आल्यानंतर लोक उष्म्यानं कंटाळतात. पण यंदाच्या उन्हाळ्याचं कोरोनाला थोपवण्यासाठी स्वागत करूया, कारण हा उन्हाळाचा कोरोनासाठी काळ ठरणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या