शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

coronavirus: कोरोनास्थिती अतिवाईटाकडे, संपूर्ण देशालाच जोखीम, महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:52 IST

coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशापुढील कोरनास्थितीचे संकट विशद केले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आढळून येत आहे, असे पॉल यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असून, तेथील परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याचे पॉल म्हणाले. रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही पॉल यांनी नमूद केले.केंद्राने केलेल्या सूचना...अनेक राज्यांमध्ये बाधितांचे विलगीकरण घरीच होत आहे. परंतु त्यावर नीट लक्ष ठेवले जात नाही तसे होत नसेल तर बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा ७२ तासांत शोध घेतला जावा आरटी-पीसीआर चाचण्यांवर अधिकाधिक भर दिला जाणे गरजेचे दाट वस्त्यांमध्ये रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक व्हाव्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आला नाहीमहाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे ३,३७,९२८ सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरी एका दिवसात तीन हजार नवे रुग्ण येत आहेत. आतापर्यंत एका दिवसात ३४ हजार रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका दिवशी ३२ मृत्यू हाेत आहेत. ते वाढून ११८ झाले आहेत.राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिवदेशाची सद्य:स्थिती  गेल्या २४ तासांत आढळलेले बाधित५६,२११मृत्युमुखी पडलेले बाधित : २७१ आजपर्यंतचे बाधित१,२०,९५,८५५बरे झालेले बाधित१,१३,९३,०२१उपचाराधीन रुग्ण५,४०,७२०एकूण कोरोनाबळी१,६२,११४ कोरोनाचा विषाणू अजूनही खूप सक्रिय आहे. हा विषाणू आपले सुरक्षाकवच भेदू शकतो. कोरोना नियंत्रणात आला आहे, असे आपण समजत असतानाच तो पुन्हा हल्ला करू शकतो. त्यामुळे संपूर्ण देशानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.     व्ही.के. पॉल, निती आयोगाचे सदस्य  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा  वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. ही अट ३० जूनपर्यंत लागू राहील.कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. रुग्णसंख्येत दैनंदिन होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून, वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस