शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Coronavirus: ...तर जूनच्या मध्यापर्यंत कोरोनाचा धोका टळेल; टाइम्स-प्रोटिव्हिटी सर्व्हेचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:51 IST

कोरोनाला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टाइम्स नेटवर्कने प्रोटिव्हीटी या जागतिक सल्लागार संस्थेच्या मदतीने केलेल्या संयुक्त पाहणीत  मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना कमाल मर्यादा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टाइम्स नेटवर्कच्या 'टाइम्स फॅक्ट इंडिया आउटब्रेक रिपोर्ट'मध्ये तीन वेगवेगळ्या शक्यता दर्शवण्यात आल्या आहेत. यामध्ये २२ मे पर्यंत भारतात ७५ हजार लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भारतातील लॉकडाउन ३ मेनंतरही वाढवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील कोरोना विषाणूच्या पुनरुत्पादनाचा दर ०.८ इतका असणार आहे. त्यामुळे एक कोरोनाचा रुग्ण ०.८ इतर लोकांमध्ये कोरोना पसरवू शकतो असा अंदाजही या अहवालात नमूद करण्यात आला आहे.

टाइम्स-प्रोटिव्हिटी सर्व्हेचा अंदाजानुसार, देशात सरकारने १५ मेपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केला तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर येण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यतचा कालावधी लागणार आहे. तसेच दूसऱ्या अंदाजानूसार देशभरात जर ३० मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जूनच्या मध्यावर शुन्यावर येईल असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे  रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

आणखी वाचा...

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात

एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल

हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी