CoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 08:14 PM2020-04-01T20:14:40+5:302020-04-01T20:16:12+5:30

मरकजमध्ये सहभागी झालेले ११०३ लोक समोर आले असून, त्यातील ६५८ जणांची चाचणी घेण्यात आली आहे.

CoronaVirus : coronavirus 386 new postitive cases in 24 hours 134 cases linked to tableeghi jamaat vrd | CoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर

CoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर

Next

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत ३८६ नवे रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी निजामुद्दीन मरकजची घटना प्रमुख कारण ठरलं आहे. दिल्लीस्थित निजामुद्दीन भागात १ ते १५ मार्चपर्यंतच्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच काही संक्रमित रुग्ण सोमवारी आणि मंगळवारी समोर आले आहेत.

तबलिगी जमातशी संबंधित १८०० लोकांना ९ रुग्णालयं आणि क्वारंटाइन केंद्रात पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी २४ तासांत ३८६ रुग्ण समोर आल्याचं सांगितलं आहे. यातील १३४ रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशात एकूण १६३७ संक्रमित रुग्ण असून, मृतांचा आकडा ३८पर्यंत पोहोचला आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले ११०३ लोक समोर आले असून, त्यातील ६५८ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यातील ११० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिल्लीत १८, तामिळनाडूत ११० नवीन रुग्ण
ते म्हणाले की, एकट्या दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये १८ नवे रुग्ण सापडले असून, तामिळनाडूमध्ये ११० नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून, त्याला रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली असून, कोरोनाला कशा प्रकारे रोखता येईल, यासंदर्भातील उपायांची चाचपणी करण्यात आली आहे. प्रवासी मजुरांना संसर्गाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी स्वतंत्र ठेवणे आणि त्यांच्या मदतीचा फेरआढावा घेण्यात आला आहे. 

देशात १२६ प्रयोगशाळांत होणारी तपासणी
भारतीय चिकित्सा विज्ञान परिषदे (आयसीएमआर)चे रमण आर. गंगाखेडकर म्हणाले, देशातील आयसीएमआरच्या प्रयोगशाळांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४५६२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गंगाखेडकर यांनी सांगितले की, आयसीएमआरच्या संयुक्‍त प्रयोगशाळांची संख्या बुधवार १२६ झाली आहे. आयसीएमआरद्वारे प्रमाणित खासगी रुग्णालयांची संख्या ४९वरून ५१ झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ४७९१५ नमुन्यांची चाचण्या घेण्यात आली आहे, ज्यापैकी ४५६२ चाचण्या मंगळवारी आयसीएमआर नेटवर्क लॅबमध्ये करण्यात आल्या. 
 

Web Title: CoronaVirus : coronavirus 386 new postitive cases in 24 hours 134 cases linked to tableeghi jamaat vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.