Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:27 IST2020-03-18T23:24:07+5:302020-03-19T07:27:14+5:30

कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज रात्री घडला आहे. 

Coronavirus: Corona suspected patient committed suicide by jumping from the Safdarjung Hospital | Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या 

नवी दिल्ली - संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव आता देशातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेले अनेक रुग्ण मानसिक तणावातून जात आहेत. दरम्यान, कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाने दिल्लीतील रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा  धक्कादायक प्रकार आज रात्री घडला आहे. 

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. हा 35 वर्षीय संशयित ऑस्ट्रेलियातील सिडनीमधून परतला होता. दरम्यान, त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून आल्याने त्याला विमानतळावरून थेट सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्याची कोरोनासंबंधीची चाचणी झाली होती. मात्र रुग्णालयात दाखल असतानाच या तरुणाना रुग्णालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. 

 

Web Title: Coronavirus: Corona suspected patient committed suicide by jumping from the Safdarjung Hospital