नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. (Covid-19) त्यामुळे विविध राज्यांसह केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (fearing a Covid-19 second wave) त्यातही महाराष्ट्रासह, केरळ, गुजरात आणि अन्य काही राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Corona patients are rise in Maharashtra, Kerala & Gujarat)समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तर गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे २५८ नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.