शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 23:15 IST

गुजरातमध्येही १८३ कोरोना रुग्ण समोर आलेत. तिथे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ८२२ इतकी संख्या पोहचली आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. अनेक राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यात नवीन कोविड रुग्ण समोर आले आहेत. त्यात हरियाणात आता १०२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एक दिवसापूर्वी हा आकडा ८७ इतका होता. गुरुग्राम जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 

महाराष्ट्रात किती?

महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८६ रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात ५९५ सक्रिय कोविड रुग्ण आहेत तर ७४९ कोरोना रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गुजरातमध्येही १८३ कोरोना रुग्ण समोर आलेत. तिथे सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ८२२ इतकी संख्या पोहचली आहे. त्यातील ७९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत तर २९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दिलासादायक म्हणजे ७८ रुग्ण बरे झाले आहेत. 

तर उत्तराखंड येथे ३ नवे कोरोना रुग्ण सापडलेत. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ९ इतकी आहे. १७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७ इतकी असून ज्यात ७ प्रवासी रुग्ण होते जे पूर्णपणे बरे झालेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या ६२२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ८८ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. 

दरम्यान, कोरोनाचा हा ओमिक्रॉन व्हेरिएंट आहे. जो वेगाने पसरत असला तरी गंभीर आजार होत नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. मास्क घालणे, ५ दिवस आयसोलेशनमध्ये राहणे आणि इतर काळजी घेणे असं आवाहन डॉ. सायन मिश्रा यांनी केले. कर्नाटकात शनिवारी कोविडमुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यात यावर्षी कोरोनामुळे मृतांची संख्या ९ झाली आहे. बंगळुरूतील ४६ वर्षीय आणि बेळगावातील ७८ वर्षीय व्यक्ती ज्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले होते. या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवारी राज्यात ५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे २०२५ या वर्षी आतापर्यंत एकूण संक्रमित संख्या ८९४ इतकी झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या