शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जनतेला सप्तसूत्री देणाऱ्या मोदींवर काँग्रेसने डागले सात तिखट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:18 IST

लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्यावतीने केंद्र सरकारला सात प्रश्न विचारले आहेतसरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यातकोरोनाला रोखण्यासाठी मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान जनतेला सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले होते

नवी दिल्ली - 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करत लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान जनतेला सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या सप्तसूत्रीवरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे. लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्यावतीने केंद्र सरकारला सात प्रश्न विचारले आहेत. तसेच या प्रश्नांचे उत्तर देण्याचे आव्हान केंद्र सरकारला दिले आहे. 

1-  कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे टेस्टिंग. 1 फेब्रुवारीपासून 13 एप्रिलपर्यंत देशात केवळ 2 लाख 17 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्राकडे काय योजना आहे. 

2 - आघाडीवर राहून कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासाठी आतापर्यंत एन-95 मास्क आणि पीपीई किट्सची मोठया प्रमाणात टंचाई आहे. याबाबत केंद्र सरकार गप्प का? ही साधने कधी उपलब्ध होतील. 

3 - कोरोनामुळे स्थलांतर केलेले कोट्यवधी मजूर आज रोजगार आणि रोजीरोटीसाठी झगडत आहेत. याबाबत तुमच्याकडे काय योजना आहे. 

4 - लाखो एकर गहू आणि इतर पिके कापणीला आली आहेत. मात्र त्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही. तसेच हमीभावाने धान्य खरेदी करण्याबाबत सरकार गप्प का आहे. शेती आणि शेतकरी सरकारच्या प्राधान्यक्रमात बसत नाहीत का?

5 - कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वीच देश बेरोजगारीशी झुंजत होता. आता बेरोजगारीचा दर भयानक रूप घेत आहे. अशा परिस्थितीत तुमचे कोविड-19 इकॉनॉमिक रिकव्हरी टास्कफोर्स कुठे आहे?

6 - देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले दुकानदार, लघु-मध्यम उद्योग देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. यांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याबाबत काय योजना आहे. 

7 - जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अब्जावधी च्या मदतीची घोषणा होत आहे. मग या यादीत आपले सरकार शेवटच्या स्थानावर का? सरकारची नियत आणि नीती देशाला भारी पडत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस