शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

coronavirus: रेल्वेंसाठी राज्यांकडून असहकार्य असल्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:20 IST

श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत. परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत.

- नितीन अग्रवाल  नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत वेगवेगळ््या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत.परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत. शेवटी केंद्र सरकारने राज्यांना म्हटले की, मजुरांच्या प्रवासात अडथळे आणू नका. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र पाठवले आहे.मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या राज्यांसोबत झालेल्या बैठकीचा आधार घेऊन भल्ला म्हणाले की, मजुरांनी रेल्वे मार्गांनी किंवा रस्त्याने पायी येणे मोठ्या चिंतेचे कारण आहे. हे मजूर घरी पोहोचण्यासाठी बस व रेल्वेंना मंजुरी दिली गेली आहे.सर्व राज्यांनी मजूर, कामगार रेल्वेमार्ग किंवा रस्त्यांनी पायी गावाकडे निघणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर असे मजूर, कामगार दिसले तर त्यांना रेल्वे किंवा बसद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी व दरम्यान जवळच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जावी.रेल्वे व गृह मंत्रालयाने हा वाद सोडवण्यासाठी राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली. या चर्चेत असे ठरले की, येत्या काही आठवड्यांत १०० श्रमिक रेल्वे चालवून अडकून पडलेल्या मजुरांना काढून नेण्याचे काम केले जाईल.लॉकडाऊन तीन पूर्ण व्हायच्या आत सरकार अडकून पडलेल्या सगळ््या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचू इच्छिते. परंतु, राज्यांनी मंजुरी न दिल्यामुळे आतापर्यंत फक्त 5.6 लाख मजुरांनाच त्यांच्या घरी पोहोचवता आले. अजूनही मोठ्या संख्येने मजूर अनेक ठिकाणी अडकून पडलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार