शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:17 IST

Coronavirus in India: कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात भारताने सुरू केलेल्या लढ्यात आता आणखी एका प्रभावी औषधाची भर पडली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. स्वित्झर्लंड येथील रोशे या कंपनीने सिप्लाच्या सहकार्याने हे औषध भारतात दाखल केले आहे. हे औषध कोणत्याही कोरोना रुग्णाला दिले तरी ते ७० टक्के परिणामकारक ठरते. हे औषध घेतल्यास कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचा प्रसंग टाळू शकतो. भारतामध्ये कॉकटेल ड्रग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिप्ला कंपनीने स्वीकारली आहे. हे औषध सध्या देशात काही विशिष्ट शहरांमधील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येईल. सिप्लाव्यतिरिक्त झायडस कंपनीनेही या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये त्याला हे औषध दिले जाते. ते देण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. कॉकटेल ड्रग दिल्यानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीवर  किमान अर्धा-पाऊण तास लक्ष ठेवले जाते. 

...असे काम करते कॉकटेल ड्रगnकॉकटेल ड्रग हे काही औषधांचे मिश्रण आहे. ते घेतल्याने रुग्णाची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. या औषधात कासिरिविमाब व इम्डेव्हीमाब या औषधांचा समावेश आहे. nया दोन्ही औषधांचे प्रत्येकी ६०० मिलिग्रॅम मिश्रण तयार करून कॉकटेल ड्रग बनवितात. nकॉकटेल ड्रग कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते. त्यामुळे विषाणूला प्रथिने मिळत नाहीत व त्याचे उत्परिवर्तन होण्यास प्रतिबंध करता येतो. 

कोरोनाचे नवे २.११ लाख  रुग्ण; ३,८४७ मृत्यूभारतात २४ तासांत कोरोनाचे नवे २ लाख ११ हजार २९८ रुग्ण आढळले तर ३,८४७ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के आहे. बुधवारी २१ लाख ५७ हजार ८५७ चाचण्या केल्या गेल्या. यामुळे देशात एकूण ३३ कोटी ६९ लाख ६९ हजार ३५३ चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर हा ९.७९ टक्के असून गेल्या सलग तीन दिवसांत तो दहा टक्क्यांच्या खाली राहिला आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत