शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Coronavirus: चिनी रॅपिड टेस्ट कीटस्; ५ लाख कीट्सच्या वादाचं प्रकरण सीबीआयकडे सोपविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:50 IST

चौकशीचे दिले आदेश?

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यासाठी चीनमधील दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेले सदोष ५ लाख जलद रक्तद्रव्य चाचणी संचावरून (रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्) मोठा वाद उफाळला आहे. घोटाळ्यासह खरेदी प्रक्रिया आणि दरावरूनही आरोप होत असल्याने हे प्रकरण सीबीआयच्या हाती जाण्याची शक्यता आहे. भारतीय औषधी महानियंत्रकांनी या पहिल्या वैद्यकीय घोटाळ्याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

भारतीय मध्यस्थांमार्फत या कीटस्चा पुरवठा करणाऱ्या दोन चिनी कंपन्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) काळ्या यादीत टाकले असले तरी हे कीटस् खरेदीसाठी २४ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या निविदेत आयसीएमआरने नवीन उपकलम समाविष्ट केल्याचे समोर आले आहे.

चौकशीतून आढळले की, आयसीएमआरने भारतीय वितरकांकडून पुरवठा करणाºया कोणत्याही कंपन्यांकडून ५ लाख कीटस्चा पुरवठा करण्यासाठी निविदा मागावल्या होत्या; परंतु ११ एप्रिल रोजी आणखी ४५ लाख कीटस्साठी दुसरी निविदा काढताना निविदाकर्त्यांसाठी आयात परवान्याची पूर्वअट घातली. एकाच प्रकारच्या कीटस्साठी दोन वेगवेगळे कलम कशासाठी? ४५ लाख कीटस् खरेदीबाबत काय झाले? याचा कोणालाही थांगपत्ता नाही; परंतु ५ लाख चिनी रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस् खरेदीचा घोटाळा बनला. पहिल्या निविदेतहत एकूण १६ कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सात कंपन्या चीनच्या होत्या, तर ९ भारतीय पुरवठादार होते.

गुआंगझोऊ वोंडफोन बायोटेक अणि झुहाई लिवझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन चिनी कंपन्यांकडून २४५ रुपये या दराने आयात करण्यात आलेले कीटस् वितरकांना ४२० रुपयांना विकण्यात आले. वितरकांनी हे कीटस् आयसीएमआरला ६०० रुपयांप्रमाणे विकल्याचे समोर आले आहे.

आयसीएमआरने हे कीटस् आयात करण्यास मंजुरी दिल्यानंतर अनेक राज्यांनी मोठ्या प्रमाणावर कीटस् खरेदी केली होती. तामिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगालने चिनी कीटस् खरेदी केली होत्या. या उलट छत्तीसगढने दक्षिण कोरियाच्या एस. डी. बायोसेन्सर कंपनीकडून थेट प्रति कीटस् ३७७ रुपये दराने म्हणजे चिनी कीटस्च्या निम्म्या किमतीत खरेदी केली.

चीनच्या उपरोक्त दोन कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कीटस्चा वापर न करण्याचे आणि ते पुरवठादारांना परत करण्याचा सल्ला आयसीएमआरने राज्यांना दिलेला आहे. तथापि, उर्वरित चिनी वितरकांना प्रतिबंध केलेला नाही.४८०० भारतीय सिंगापूरमध्ये कोरोनाबाधितसिंगापूर : सिंगापूरमध्ये जवळपास ४८०० भारतीय नागरिक हे एप्रिल महिनाअखेर कोरोना विषाणूच्या चाचणीत सकारात्मक आढळले. यातील बहुतेक जण हे विदेशी कामगारांसाठीच्या डॉर्मिटरीजमध्ये राहतात. ही माहिती सोमवारी येथील भारतीय उच्चायुक्तालयाने दिली. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची एकूण संख्या १८,२०५ असून, १८ जणांचा मृत्यू झाला, असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. भारतीय कामगारांना झालेली बाधा ही सौम्य असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरफ यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन