शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतात या आठवड्यात लॉन्च होणार कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध, एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:57 IST

Coronavirus in India: मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली - मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

मॅनकाईंड फार्माचे चेअरमन आर.सी. जुनेजा यांनी सांगितले की, मोलुलाईफच्या पूर्ण उपचारांवर १४०० रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. हे औषध एका आठवड्यामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. एका रुग्णाणसाठी मोलनुपिरवीर हे औषध पाच दिवसांपर्यंत दररोज दोन वेळा ८०० मिलिग्रॅम रेकमेंड करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एका रुग्णाला २०० मिलिग्रॅम औषध म्हणून ४० गोळ्या घेण्याची गरज आहे. याच्या ओरल पिलचे उत्पादन हे १३ भारतीय औषध कंपन्यांकडून करण्यात येईल. त्यामध्ये टोरंट, सिप्ला, सनफार्मा, डॉ. रेड्डीज, नेटको, माइलान आणि हेटेरो यांचा समावेश आहे.  मॅनकाईंड फार्मा देशामध्ये कोविड-१९ चे औषध मोलुलाइफ (मॉलनुपिरेविर) च्या लाँचिंगसाठी बीडीआर फार्मास्युटिकल्ससोबत भागीदारी केली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने एका वक्तव्यामध्ये सांगितले होते की, या भागीदारींतर्गत बीडीआर फार्माकडून उत्पादन करण्यात येईल. तर विपणण, विक्री, प्रचार, वितरण मॅनकाईंड फार्मा करेल.

मॅनकाईंड फार्माचे वरिष्ठ अध्यक्ष (विक्री आणि विपणण) संजय कौल यांनी सांगितले की, कंपनी कोविड-१९ विरोधातील लढाईला बळ देण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलेल, तसेच या क्रमामध्ये मोलुलाइफला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केले जाईल. डीसीजीआयने कोविड-१९ वरील उपचारांसाठी अँटिव्हायरल औषध मॉलनुपिरेवीरला देशात आपातकालिन वापरासाठी मान्यता दिली होती.

या औषधाच्या परीक्षणासाठी एक हजार रुग्णांवर त्याची चाचणी करण्यात येणार आहे. भारताच्या ड्रग रेग्युलेटरकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या औषधाची निर्मिती आणि मार्केटिंगला परवानही देणाऱ्या पत्राम्ये सांगितले आहे की, तीन महिन्यांच्या आत क्लीनिकल ट्रायलची अपडेट डिटेल्स द्यावी लागेल.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस