Coronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:49 PM2020-04-01T16:49:36+5:302020-04-01T16:50:34+5:30

चीनमध्ये ३ हजार ३००, स्पेनमध्ये ५ हजार ६०० तर इटलीत ५ हजार आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, भारतातही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

Coronavirus: Breaking: 1 doctor in Delhi Corona-positive, Kejriwal said we are taking care | Coronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय

Coronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्व लोक दहशतीखाली जीवन जगत आहेत. अशात व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णाची देखभाल करणारे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना थोडीशी चूकही किती महागात पडू शकते याची जाणीव आहे. त्यामुळे मेडिकल स्टाफही काळजीने काम करत आहे. मात्र, आता राजधानी दिल्लीतडॉक्टर्संना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. येथील ६ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 

चीनमध्ये ३ हजार ३००, स्पेनमध्ये ५ हजार ६०० तर इटलीत ५ हजार आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, भारतातही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सर्वात प्रथम येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यानंतर, या महिला डॉक्टर सेल्फ क्वारंटाईमध्ये गेल्या आहेत. दिल्लीतील एका कर्करोग संस्थेत या महिला डॉक्टर कार्यरत होत्या. या डॉक्टर नुकत्याच आपल्या भावाच्या घरी जाऊन आल्या असून त्यांचा भाऊ काही दिवसांपूर्वीच युकेमधून भारतात परतला आहे. या महिला डॉक्टरची केस पॉझिटीव्ह असल्याचे समजताच, येथील रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, आता आणखी ३ डॉक्टर्संचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

सफदरजंग हॉस्पीटलमधील आणखी २ डॉक्टरांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी एक डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत. तर, दुसरी महिला डॉक्टर वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असून ती नुकतीच विदेशातून भारतात आली आहे. तसेच आणखी एक डॉक्टर पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यामुळे दिल्लीत एकूण ४ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व मेडिकल स्टाफशी विशेष काळजी घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच, कुणाला काहीही होणार नाही. तरीही, दुर्घटना घडल्यास दिल्ली सरकार संबंधित कुटुंबीयांची पूर्ण जबाबदारी घेणार असून पीडित कुटुबीयांस १ कोटी रुपयांची मदतही करेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भारतातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची अवस्था आणखी चिंताजनक आहे. देशातील बर्‍याच सरकारी रुग्णालयांमध्ये मास्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारी संरक्षित साहित्य, आणि सॅनिटायझर्सची कमतरता आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये असलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ५०० हून अधिक ज्येष्ठ आणि निवासी डॉक्टर आहेत. काही दिवसांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयातून पाठविलेल्या चार नमुन्यांमध्ये कोविड -१९ ची पुष्टी झाली होती. त्यामुळे आता या संपूर्ण रुग्णालयात अभूतपूर्व संकट उभं राहिलेलं दिसतं.
 

Web Title: Coronavirus: Breaking: 1 doctor in Delhi Corona-positive, Kejriwal said we are taking care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.