शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनावरील औषध आता ८५ रुपयांत खरेदी करा; भारतीय कंपनीची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:49 AM

Antiviral drug Favipiravir:औषध उत्पादन कंपनी बाल फार्मानं सोमवारी कोविड १९ च्या उपचारासाठी बालफ्लू ब्रँडच्या नावानं फैविपिरावीर हे अँन्टिवायरल औषध लॉन्च केले आहे.

ठळक मुद्देफैविपिरावीर या औषधाचा वापर कोविड १९ च्या सौम्य आणि मध्यम संक्रमण असलेल्या रुग्णांवर करता येईल. हे औषध ४०० एमजी टॅबलेटच्या स्वरुपात मिळेल. त्याची किंमत ८५ रुपये प्रतिटॅबलेट इतकी असणार आहे.भारतीय औषध महानियंत्रण(DCGI)नं कोविड १९ उपचारासाठी बालफ्लूच्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली – सध्या देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. या संकटात दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मिळणारं औषध फक्त ८५ रुपयात खरेदी करू शकता. लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लस उपलब्ध नाहीत. अशावेळी कोरोनावरील उपचारासाठी ८५ रुपयात आलेले औषध रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

औषध उत्पादन कंपनी बाल फार्मानं सोमवारी कोविड १९ च्या उपचारासाठी बालफ्लू ब्रँडच्या नावानं फैविपिरावीर हे अँन्टिवायरल औषध लॉन्च केले आहे. बंगळुरू येथील कंपनीने सांगितले की, हे औषध ४०० एमजी टॅबलेटच्या स्वरुपात मिळेल. त्याची किंमत ८५ रुपये प्रतिटॅबलेट इतकी असणार आहे. फैविपिरावीर या औषधाचा वापर कोविड १९ च्या सौम्य आणि मध्यम संक्रमण असलेल्या रुग्णांवर करता येईल. बालफ्लूचा वापर ५३ प्रकारच्या विषाणूंच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. भारतीय औषध महानियंत्रण(DCGI)नं कोविड १९ उपचारासाठी बालफ्लूच्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. तरीही २३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही २० टक्क्यांहून जास्त असल्याने चिंता कायम आहे. मात्र, महाराष्ट्राने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत असून एकाही जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर नसल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३८२ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आहे. गोवा, सिक्कीम, पश्च‍िम बंगाल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, नागालँड, पुदुच्चेरीसह एकूण १३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांहून अधिक आहे.

रोश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध

रोश इंडिया आणि सिप्ला यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेले अँटिबॉडी कॉकटेल बाजारात दाखल झाले आहे. कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब यांच्यापासून हे अँटिबॉडी कॉकटेल बनले आहे. सिप्लाच्या वितरण प्रणालीच्या माध्यमातून हे कॉकटेल उपलब्ध होऊ शकते. देशात आपत्कालीन वापरासाठी या कॉकटेलला अलीकडेच मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या