CoronaVirus Arvind Kejriwal's wife Sunita Kejriwal corona positive CM also isolated | CoronaVirus : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्रीही आयसोलेट

CoronaVirus : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्रीही आयसोलेट

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनीही स्वतःला आयसोलेट केले आहेमुख्यमंत्री केजरीवाल स्वतः क्वारनटाइन झाले आहेत.गेल्या वर्षी जून महिन्यात अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर, आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही स्वतःला आयसोलेट केले आहे. (Arvind Kejriwal's wife corona positive CM also isolated)

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनीही स्वतःला आयसोलेट केले आहे. तर मुख्यमंत्री स्वतः क्वारनटाइन झाले आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दिल्लीतील सध्य स्थिती लक्षात घेता अरविंद केजरीवाल सातत्याने सक्रिय आहेत. तसेच बैठकांबरोबरच अनेक ठिकाणचा दौराही करत आहेत.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

राजधानी दिल्लीत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. येथे रोजच्या रोज कोरोना बाधितांची विक्रमी संख्या नोंदविली जात आहे. कालही दिल्लीत 23 हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

दिल्लीतील कोरोनाची स्थिती -
गेल्या 24 तासांतील नवे रुग्ण - 23,686
गेल्या 24 तासांतील मृत्यू - 240
एकूण रुग्ण - 8,77,146
सक्रिय रुग्ण - 76,887
एकूण मृत्यू - 12,361 

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Read in English

English summary :
CoronaVirus Arvind Kejriwal's wife corona positive CM also isolated

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Arvind Kejriwal's wife Sunita Kejriwal corona positive CM also isolated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.