शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतात सापडला कोरोना विषाणूचा अजून एक खतरनाक व्हेरिएंट, संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 09:42 IST

Coronavirus in India: भारतात कोरोना विषाणूच्या एका व्हेरिएंटने आधीच धुमाकूळ घातला असताना आता देशात या विषाणूचा अजून एक व्हेरिएंट सापडला आहे. आता या व्हेरिएंटबाबत अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू सातत्याने आपले रूप बदलून अधिकाधिक धोकादायक होत चालला आहे. या विषाणूने नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. (Coronavirus in India) भारतात कोरोना विषाणूच्या एका व्हेरिएंटने आधीच धुमाकूळ घातला असताना आता देशात या विषाणूचा अजून एक व्हेरिएंट सापडला आहे. आता या व्हेरिएंटबाबत अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Another dangerous variant of coronavirus found in India )भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. तेथून हा व्हेरिएंट भारतात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला गेला होता. मात्र आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमधून कोरोना विषाणूचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. त्यातील दुसऱ्या व्हेरिएंटचे नाव बी.१.१.२८.२ असे आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार तज्ज्ञांनी या व्हेरिएंटची चाचणी एका उंदरावर केली. त्याचे परिणाम धक्कादायक होते. तज्ज्ञांना या संशोधनामधून दिसून आले की, संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आत याची ओळख पटवता येऊ शकते. हा व्हेरिएंट एवढा धोकादायक आहे की, तो रुग्णाच्या शरीराचे वजन ७ दिवसांमध्ये कमी करू शकतो. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच हा विषाणूसुद्धा अँटीबॉडी कमी करू शकतो. पुण्यातील नॅशन इन्स्टीट्युट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या तज्ज्ञांनी सांगितले की, बी.१.१.२८२ व्हेरिएंट परदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये मिळाला होता. या व्हेरिएंटची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली आहे. तसेच त्याचे परीक्षण करण्यात आले आहे. सध्या भारतात याचे अधिक रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक सापडला आहे. परदेशातून आलेल्या दोन जणांची सॅम्पल सिक्वेंसिंग करण्यात आली होती. कोरोनामधून रिकव्हर होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणे दिसून येत नव्हती. मात्र याची सॅम्पल सिक्वेंसिंग केल्यानंतर जेव्हा बी.१.१.२८.२ व्हेरिएंटी माहिती मिळाली तेव्हा त्याची नऊ सिरीयन हेमस्टर उंदरांवर चाचणी घेण्यात आली. यामधील तीन उंदरांचा मृत्यू हा शरीरातील अंतर्गत भागात संसर्ग वाढल्याने झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य