शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus: कोरोनापासून वाचवण्यासाठी आल्या पऱ्या, लोकांना वाटल्या खऱ्या, दर्शनासाठी जमली हजारोंची गर्दी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:32 IST

Coronavirus in India: कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.

भोपाळ - गेल्या सव्वा वर्षापासून देशात कोरोनाच्या साथीचा फैलाव सुरू आहे. कोट्यवधी लोकांना आजारी पाडणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या या विषाणूवर अद्याप हमखास असे औषध सापडलेले नाही. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस ही परिणामकारक ठरत असल्याने लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील राजगड मध्ये घडला आहे. (Angels came to save from Coronavirus, people thought it was real, thousands of people gathered to see)

कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी दोन पऱ्या आल्या आहेत, अशी अफवा मध्य प्रदेशमधील राजगड येथील चाटूखेडा गावामध्ये पसरली. त्यानंतर या पऱ्यांच्या दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी जमली. यावेळी जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही उल्लंघन केले. येथील लोकांना गावातील दोन महिलांच्या शरीरामध्ये देवपऱ्या आल्याचे सांगितले. या पऱ्यांच्या हातातून जो कुणी आपल्या अंगावर पाणी शिंपडून घेईल. त्याला कोरोना होणार नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे या देवीपऱ्यांकडून पवित्र पाणी शिंपडून घेण्यासाठी घराघरांमधून लोक बाहेर पडले. 

बघता बघता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला. जमलेले लोक कोरोनाबाबतच्या कुठल्याही नियमांचे पालन करत नव्हते. तसेच त्यांच्यापैकी अनेकांनी मास्कही लावला नव्हता. तसेच सोशल डिस्टंसिंगचेही ते पालन करत नव्हते.  अखेर या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी लोकांना तिथून हटवले आणि पऱ्या असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत