शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

Coronavirus : रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्यास परवानगी द्या - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:40 IST

coronavirus : मुंबई आयआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विदेशातून परतलेल्यांपैकी कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या, पण तशी कोणतीही चिन्हे दिसून न येणाऱ्या रुग्णांना या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशातील सर्व शिक्षण संस्थांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. नवोदय शाळांची रिकामी हॉस्टेल स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला क्वारंटाइन सुरू करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे.सर्व शिक्षणसंस्था बंद असल्याने व परीक्षाही स्थगित झाल्याने हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी घरी वा नातेवाइकांकडे गेले आहेत. त्या रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाने शिक्षणसंस्थांना केली होती. त्यानुसार मुंबईतील आयआयटीच्या चार हॉस्टेल व गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइन याआधीच सुरू करण्यात आले आहे.मुंबई आयआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विदेशातून परतलेल्यांपैकी कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या, पण तशी कोणतीही चिन्हे दिसून न येणाऱ्या रुग्णांना या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आयआयटीच्या पवई संकुलातील वनविहार गेस्ट हाउस, एच-१८, एच-बी (बी-विंग), एमटीएनएल गेस्ट रूम येथे या क्वारंटाइन सुरू करण्यात आल्या आहेत.रिकामी हॉस्टेल, गेस्ट हाउसमध्ये क्वारंटाइन सुरू करण्याची प्रशासनाने केलेली विनंती दिल्ली आयआयटीने मात्र अमान्य केली आहे. देशाच्या विविध भागांतून दिल्ली आयआयटीत शिकायला आलेले विद्यार्थी सध्या घरी परतले असले तरी परदेशी विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आहेत. त्यामुळेच तिथे क्वारंटाइन सुरू करण्यास दिल्ली आयआयटीने नकार दिला.तेलंगणात विद्यार्थ्यांचा विरोधउत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध विद्यापीठ, तेलंगणातील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ येथील संकुलातही कोरोनाग्रस्तांसाठी क्वारंटाइन सुरू करण्यात आली आहेत. त्तेलंगणातील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी दर्शविलेल्या विरोधाला प्रशासनाने जुमानले नाही. गौतम बुद्ध विद्यापीठातील क्वारंटाइनमध्ये १५० रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या