शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 13:48 IST

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. (Delta Plus Variant)

नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus Variant ) सरकारची चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकचा समावेश आहे. एवढेच नाही, तर डेल्टा+ हा व्हेरिएंट ऑफ कंसर्न अहे. यामुळे राज्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. जाणून घ्या, हा व्हेरिएन्ट नेमका कशामुळे आहे अत्यंत धोकाघातक आहे? का एवढा भयभीत करणारा आहे याचा फैलाव? (CoronaVirus all you need to know about delta plus variant Delta Variant)

सर्वप्रथम जाणून घेऊया, कुठल्या राज्यात किती रुग्ण? -महाराष्ट्र- 21मध्य प्रदेश- 6केरळ- 3तामिळनाडू- 3कर्नाटक- 2आंध्र प्रदेश- 1पंजाब- 1जम्मू- 1

CoronaVaccination : कोरोना लशीमुळे महिलांना मासिक पाळीची समस्या! 'या' रिपोर्टनं टेन्शन वाढवलं

वेगाने वाढतोय डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) प्रभाव - डब्ल्यूएचओजगात कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा या व्हायरसच्या इतर स्वरूपांच्या तुलनेत अधिक प्रभावी होत चालला आहे. कारण हा अत्यंत वेगाने पसरतो. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात समोर आला होता. मात्र, आता हा जगातील किमान 80 देशांमध्ये पसरला आहे. बी.1.617.2 डेल्टा व्हेरिएंट हा भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळून आला होता.

डेल्टा व्हेरिएंट सर्वात मोठा धोका - फाउचीव्हाइट हाऊसमधील मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे, की कोरोनाचा अत्यंत संक्रमक व्हेरिएंट ‘डेल्टा’ हा महामारीचा सफाया करण्याच्या प्रयत्नांसाठी सर्वात मोठा धोका आहे. अमेरिकेत आढळणाऱ्या नव्या कोरोना बाधितांत 20 टक्क्यांहून अधिक रुग्णांत डेल्टा व्हेरिएंट हाच संक्रमणाचे मुख्य कारण आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत नव्या रुग्णांपैकी दहा टक्के रुग्णांत हा व्हेरिएंट आढळून आला होता, असेही ते म्हणाले.

Delta Plus : लहान मुलांसाठी किती घातक आहे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट, काय म्हणाले एक्सपर्ट?

...म्हणून अधिक भयभीत करणारा आहे डेल्टा प्लस व्हेरिएंटचा फैलाव?केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हणण्यात आले आहे, की भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (आयएनएसएसीओजी)ने इशारा दिला होता, की डेल्टा प्लस व्हेरिएंट, हा ‘सध्या चिंताजनक व्हेरिएंट आहे. वेगाने प्रसार, फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला घट्ट चिकटणे आणि ‘मोनोक्लोनल अंटीबॉडी’ प्रतिक्रियेत संभाव्य कमतरता, अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.

नुकताच या देशांत सापडलाय हा व्हेरिएंट -कोरोना व्हायरसचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट भारताशिवाय -अमेरिकाइग्लंडपोर्तुगालस्वित्झर्लंडजपानपोलंडनेपाळचीनआणि रशियात आढळून आला आहे. 

या व्हेरिएंटविरोधात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन प्रभावी आहे?आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे  दोन्ही भारतीय लशी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. मात्र, ते कितपत आणि किती प्रमाणावर अँटीबॉडी तयार करू शकतात, यासंदर्भातील माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतAmericaअमेरिकाEnglandइंग्लंड