coronavirus: After Modi's speech, Aamir Khan's hollow toe, given toll free number about mental health professional by tweet | coronavirus: मोदींच्या भाषणानंतर आमीर खानचा 'खोचक' टोला, दिला टोल फ्री नंबर

coronavirus: मोदींच्या भाषणानंतर आमीर खानचा 'खोचक' टोला, दिला टोल फ्री नंबर

 

मुंबई - कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सामूहिक शक्तीचं दर्शन घडविण्याचं आवाहन केलं आहे. देशात कोरोनाच्या संकटात लढताना कोणालाही आपण एकटे आहोत असं वाटू नये यासाठी मोदींनी लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ५ एप्रिल रात्री ९ वाजून ९ मिनिटांसाठी देशात प्रकाशाचा तेज निर्माण करा, यामुळे १३० कोटी जनतेची महाशक्ती या संकटाविरोधात एकवटली आहे हे दिसून येईल असं सांगितले. त्यामुळे, थाळीनंतर आता दिवे लावण्याच आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मोदींच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांमध्ये शाब्दीक युद्धच सुरु झालं आहे. तर, दिग्गज कलाकार आणि क्रिकेटर्सही सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. अभिनेता आमीर खानने मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच एक फोटो ट्विट केला आहे. आमीरचा हा इशारा मोदींच्या भाषणाकडेच असल्याची चर्चा ट्विटरवर रंगली आहे.  

शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले. त्याचसोबत घराच्या दरवाजात, बालकनीत उभं राहून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅशलाईट लावण्याचं आवाहन केले. त्यामुळे चारही दिशांना प्रत्येक व्यक्ती दिवा लावेल त्या प्रकाशातून महाशक्तीचं रुप दिसेल. याचा अर्थ असा की, कोरोना संकटाचा मुकाबला कोणी एकटा करत नाही तर सामूहिकपणे आपण या लढाईत उतरलो आहे असं मोदी म्हणाले. मात्र, हे आवाहन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगायलाही विसरले नाहीत की, याचं कोणतंही आयोजन करु नका, कोणत्याही रस्त्यावर, गल्लीबोळात एकत्र जमू नका, फक्त घरातील दरवाजा, बालकनी याचठिकाणी हे करायचं आहे. सोशल डिस्टेंसिगची लक्ष्मण रेषा पार करु नका, कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टेंसिंगचा नियम तोडू नये हाच रामबाण उपाय आहे असं ते म्हणाले.

मोदींच्या भाषणानंतर, मोदी विरोधकांनी, भक्तलोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरतील, असे म्हटलंय. तर, दिग्दर्शक फराह खाननेही ट्विट करुन देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलंय. कुणीतरी एखादा आर्थिक तज्ञ नियुक्त करावा आणि देशातील आर्थिक परिस्थितीचा सामना व उपाय करावेत, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता आमीर खानचे ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. आमीरने ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, टोल फ्री क्रमांक दिला असून मानसोपचाराला बोलण्यासाठी येथे कॉल करा असे म्हटले आहे. मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच आमीरने हा फोटो ट्विट केल्यामुळे त्याच्या ट्विटवर तशाच प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी आमीरचं समर्थन केलंय, तर काहींनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत, त्यावर का ट्विट केलं नाही, असा प्रश्न उपस्थित केलाय. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: After Modi's speech, Aamir Khan's hollow toe, given toll free number about mental health professional by tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.