coronavirus:रेल्वे प्रवासात मास्क न वापरल्यास कारवाई होणार, विनामास्क प्रवाशांकडून एवढा दंड वसूल करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 16:23 IST2021-04-17T16:20:22+5:302021-04-17T16:23:36+5:30
coronavirus News : कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

coronavirus:रेल्वे प्रवासात मास्क न वापरल्यास कारवाई होणार, विनामास्क प्रवाशांकडून एवढा दंड वसूल करणार
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. (Indian Railway) रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले असून, मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करून संबंधितांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचा हा नियम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही अन्य नियमही लागू केले आहेत. ( Action will be taken if the mask is not used in the train journey, 500 Rs. fine will be collected from the passengers without mask)
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत वर्मा यांनी सांगितले की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कोविड-१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक नाही. मात्र प्रवाशांना केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करावे लागेल.
Indian Railways is taking various measures to contain the spread of the resurgence of Covid-19 pandemic. One of the specific guideline is to wear face masks/covers.
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 17, 2021
Fine upto Rs 500 shall be imposed on persons for not wearing a face mask/cover in Rly. premises(including trains) pic.twitter.com/VfnWzC2qFC
कोरोनाच्या साधीमुळे स्वच्छतेचे निकष पाळण्यासाठी रेल्वेने प्रवासात मिळणाऱ्या भोजनाची सुविधा बंद केली होती. तसेच रेडी टू इट भोजन सुरू केले होते. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लव्हज आदी वस्तू रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहेत.
सध्या रेल्वे एकूण १४०२ स्पेशल ट्रेन चालवत आहे. एकूण ५३८१ उपनगरीय लोकल आणि ८३० पँसेंजर ट्रेन भारतीय रेल्वेकडून चालवल्या जात आहेत. त्याशिवाय २८ स्पेशल क्लोन ट्रेन पण चालवल्या जात आहेत.