शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 10:25 IST

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देमंगळवारी देशभरात कोरोनाचे पाच हजार ६११ नवे रुग्ण सापडले आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ६ हजार ७५० रुग्ण सापडले आहे४२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रात्प आकडेवारीनुसार सध्या देशात ६१ हजार १४९ रुग्ण आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत आहे. सोमवारी एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी तब्बल पाच हजार ६११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या आकडेवारीनुसार मंगळवारी देशभरात कोरोनाचे पाच हजार ६११ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात आढळलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच एका दिवसात सर्वाधिक सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मंगळवारी दिवसभरात देशामध्ये १४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ६ हजार ७५० रुग्ण सापडले आहे. पैकी ३ हजार ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रात्प आकडेवारीनुसार सध्या देशात ६१ हजार १४९ रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या

म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण... 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांवर, पण देशवासियांसाठी ही आहे दिलासादायक खबर 

केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले... दरम्यान, भारतातील राज्यांचा विचार केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 2127 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 37136 एवढी झाली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २२५६३ पर्यंत पोहोचली असून, आज दिवसभरात मुंबईत १४११ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मंगळवार १९ मे रोजी नवीन 1202 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9639 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 26164 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत