शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:26 IST

Coronavirus : देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी एका चिमुकल्याने मदतीचा हात दिला आहे. आंध्रप्रदेशमधील एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले 971 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. हेमंत असं या चिमुकल्याचं नाव असून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंतने सायकल विकत घेण्यासाठी काही पैसे साठवले होते. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे त्याने सायकलसाठी साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले.

विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे. तिथे जाऊन चार वर्षाच्या हेमंतने आपले सायकलसाठी जमा केलेले 971 रुपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले आहेत. यामुळे चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशात गेल्या 24 तासांत 354 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4421 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 114 वर पोहोचला आहे. देशातील 4421 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 325 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण

'फिर मुस्कुराएगा इंडिया...फिर जीत जाएगा इंडिया', नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशDeathमृत्यूIndiaभारत