शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Coronavirus : चिंताजनक! दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३५२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 08:37 IST

Coronavirus : दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे तबलिगी जमात मरकजशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी दिलासादायक बातमी समोर आली. देशात आतापर्यंत ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र यानंतर आता चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५६ रुग्ण आढळले असून देशीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ९००० च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत तब्बल कोरोनाचे ३५६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे तबलिगी जमात मरकजशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या १४ तासांत दिल्लीत कोरोनाने  ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतील एकूण २८ जणांनी जीव गमावला. ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी