CoronaVirus News: अखेरपर्यंत सोडली नाही मित्राची साथ; अमर आणि याकूबच्या मैत्रीला सोशल मीडियाचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:51 PM2020-05-17T16:51:46+5:302020-05-17T16:54:48+5:30

CoronaVirus News: शेवटच्या क्षणापर्यंत मैत्रीचं नातं निभावलं; आजारी मित्राला कुशीत घेऊन रस्त्यातच थांबला

CoronaVirus 24 year old on way to UP dies friend stays with him till end kkg | CoronaVirus News: अखेरपर्यंत सोडली नाही मित्राची साथ; अमर आणि याकूबच्या मैत्रीला सोशल मीडियाचा सलाम

CoronaVirus News: अखेरपर्यंत सोडली नाही मित्राची साथ; अमर आणि याकूबच्या मैत्रीला सोशल मीडियाचा सलाम

Next

भोपाळ: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प असून त्याचा सर्वाधिक फटका मजूर आणि कामगारांना बसला आहे. हाताला कामच नसल्यानं उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी मजुरांनी शहरं सोडून आपल्या गावची वाट धरली आहे. मिळेल त्या वाहनानं, तर कधी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत मजूर घराकडे निघाले आहेत. संकटाच्या काळात आपल्या माणसांनी पाठ फिरवल्याच्या घटना घडत असताना रक्ताचं नात नसतानाही काही जण अडचणीत सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात असल्याच्या काही घटनादेखील समोर येत आहेत. 

मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्य हृदय हेलावून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला. २४ वर्षांचा अमृत गुजरातमधून उत्तर प्रदेशला निघाला होता. त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्र याकूब आणि इतर प्रवासी होते. रस्त्यात असताना अचानक अमृतची तब्येत बिघडली. त्याला उपचारांची गरज होती. मात्र चालकानं त्याला मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यात उतरवलं. अमृतच्या मदतीसाठी याकूबदेखील ट्रकमधून उतरला. रस्त्याच्या कडेला अमृतला कुशीत घेऊन याकूब गाड्यांना थांबण्याची विनंती करत होता.

या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याकूब अमृतासाठी बराच वेळ मदत मागत होता. मात्र कोणीही मदतीला आलं नाही. खूप वेळानं मदत मिळाल्यानंतर अमृतला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना अमृतचा मृत्यू झाला. याकूब अगदी शेवटपर्यंत अमृताच्या सोबतीला होता.

'अमृतला खूप ताप होता. त्याला उलट्या होत होत्या. उन्हामुळे त्याला त्रास झाला. अमृतला कोरोनाची बाधा झाली होती की नाही, याची माहिती त्याचा अहवाल आल्यानंतर समजेल,' अशी माहिती डॉ. पी. के. खरे यांनी दिली. याकूबला सध्या क्वॉरंटिन करण्यात आलं असून त्याची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र अद्याप चाचणीचा अहवाल आलेला नाही. 

राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?

मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Web Title: CoronaVirus 24 year old on way to UP dies friend stays with him till end kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.