CoronaVirus: मुख्यमंत्र्यांसोबतच्या 'व्हिडीओ कॉन्फरन्स'मध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेले २१ महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:21 IST2020-04-27T14:39:02+5:302020-04-27T16:21:36+5:30

देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

CoronaVirus 21 important points raised by PM Modi in a video conference with CM kkg | CoronaVirus: मुख्यमंत्र्यांसोबतच्या 'व्हिडीओ कॉन्फरन्स'मध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेले २१ महत्त्वाचे मुद्दे

CoronaVirus: मुख्यमंत्र्यांसोबतच्या 'व्हिडीओ कॉन्फरन्स'मध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेले २१ महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याआधी मोदींनी तीन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली. या बैठकीत मोदींनी २१ महत्त्वाचे मुद्दे मांडले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
१. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते, आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. याशिवाय मृतांचा आकडादेखील कितीतरी जास्त आहे. 
२. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेनेदेखील साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला, ते आपण पाहतोय.
३. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.
४. आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणायचे आहे. परदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे. त्यांना लगेच चाचण्या करून क्वारंटाईन करायचे आहे.
५. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे.   
६. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हेदेखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.
७. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण तयार करा.
८. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहेत.
९. ३ मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
१०. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.
११. पुढे जाऊन रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टींचा यात समावेश असेल.
१२. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तात जास्त तपासा.
१३. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत
१४. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज. असे झोन्स फुल प्रुफ करा.
१५. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान  आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका  
१६. कोरोनशिवाय इतर आजारांचा सामना कराव्या लागणाऱ्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.
१७. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली. पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.  
१८. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचे नियोजन आवश्यक आहे.
१९. सुधारणा घडवण्याची हीच सुसंधी आहे. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.
२०. प्रत्येक राज्याने सुधारणांवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला.
२१. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

 

अन्य बातम्या वाचा...

गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

Web Title: CoronaVirus 21 important points raised by PM Modi in a video conference with CM kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.