coronavirus : गेल्या 24 तासांत सापडले 1463 नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10,815 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:35 PM2020-04-14T19:35:46+5:302020-04-14T19:40:11+5:30

देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले

coronavirus: 1463 new corona positive patients found in last 24 hours in india BKP | coronavirus : गेल्या 24 तासांत सापडले 1463 नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10,815 वर

coronavirus : गेल्या 24 तासांत सापडले 1463 नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10,815 वर

Next
ठळक मुद्दे24 तासांत देशभरात कोरोनाचे 1463 नवे रुग्ण सापडले देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 815 वर पोहोचला देशात आतापर्यंत 1190 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढू लागले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1463 नवे रुग्ण सापडले असून, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 815 इतका झाला आहे. यादरम्यान 29 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 353 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1190 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

 दरम्यान, देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व व्यवहार, रेल्वे, विमानसेवा येत्या 3 मेपर्यंत बंद राहतील. मात्र पुढील आठवडाभर कठोर परीक्षण करून काही ठिकाणी लॉकडाऊनमधून सवलत देण्यात येईल, असे संकेत मोदींनी दिले आहेत.

Web Title: coronavirus: 1463 new corona positive patients found in last 24 hours in india BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.