CoronaVirus: गरीब, मजुरांना साडेसात हजार रुपये द्या- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:49 AM2020-04-24T05:49:01+5:302020-04-24T07:10:36+5:30

कोरोनामुळे १२ कोटी बेरोजगार झाल्याची टीका

CoronaVirus 12 crore jobs lost in lockdown give at least Rs 7500 to each family Sonia Gandhi to PM Modi | CoronaVirus: गरीब, मजुरांना साडेसात हजार रुपये द्या- सोनिया गांधी

CoronaVirus: गरीब, मजुरांना साडेसात हजार रुपये द्या- सोनिया गांधी

Next

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या काळात आर्थिक कारभार थांबल्याने १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ही भयावह बेरोजगारी अजून वाढेल, गोरगरिबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल. गरीब, मजुरांच्या मदतीसाठी त्यांच्या खात्यात सरसकट साडेसात हजार रुपये जमा करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली. पीपीई व कोरोना टेस्टिंग किटच्या खराब गुणवत्तेवरूनही त्यांनी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनामुळे येणाºया जागतिक, आर्थिक, सामाजिक संकटांवर त्यांनी काँग्रेस कार्य समितीच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवायलाच हवी, यावर त्यांनी भर दिला. 

देश संकटातून जात असताना भारतीय जनता पक्ष मात्र धार्मिक विद्वेष पसरवत असल्याचा थेट आरोप सोनिया गांधी यांनी केला. पालघरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानास महत्त्व आहे.

लॉकडाउनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालास बाजारपेठच नाही. खरेदी धोरण अद्यापही केंद्राने स्पष्ट केले नाही. पुरवठा साखळीत असंख्य अडचणी आल्या आहेत. अशावेळी केंद्राने तत्काळ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी. - सोनिया गांधी

Web Title: CoronaVirus 12 crore jobs lost in lockdown give at least Rs 7500 to each family Sonia Gandhi to PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.