शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaViarus : लसीकरणाला लागणार ३० महिने! मे महिन्यात ४२%नी प्रमाण घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

नागरिकांचे लसीकरण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या देशात ९० कोटी एवढी आहे.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील देशव्यापी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली. मात्र, ९ मेपर्यंत लसीकरणाचा वेग तब्बल ४२ टक्क्यांनी घसरल्याचे वास्तव समोर आले आहे. एप्रिल महिन्यात प्रतिदिन २९ लाख ३३ हजार लोकांना लसीच्या मात्रा दिल्या जात होत्या. परंतु मे महिन्यात हेच प्रमाण प्रतिदिन १७ लाखांपर्यंत आले आहे. याच गतीने १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असेल तर संपूर्ण लसीकरणासाठी भारताला ३० महिने लागतील. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांपुढील 

नागरिकांचे लसीकरण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या देशात ९० कोटी एवढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करताना प्रतिदिन ५० लाख लोकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु ११ एप्रिलचा दिवस वगळता एवढ्या प्रमाणात लसीकरण होऊ शकले नाही. ११ एप्रिल रोजी देशभरात ४० लाख लोकांचे लसीकरण झाले होते. एप्रिल महिन्यात लसीकरणाचा वेग चांगला होता. परंतु मे महिन्यात त्यात घसरण झाल्याचे आढळून आली आहे. १ ते ९ मे या दरम्यान प्रतिदिन १२ लाख ४५ हजार लस मात्रा दिल्या गेल्याचे प्राप्त आकडेवारीतून निदर्शनास येते. याच गतीने लसीकरण झाल्यास ९० कोटी लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास ३० महिने लागू शकतात.

तूर्तास लसींचा तुटवडा असल्याने असे होत आहे. एरव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट उत्तम होते. ते बऱ्यापैकी पूर्ण होत होते.- डॉ. व्ही.के. पॉल, टास्क फोर्सचे प्रमुख

लसींचे उत्पादन युद्धपातळीवर- कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी लसींचे उत्पादन वाढविण्याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. - लसींच्या उत्पादनवाढीला आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या केंद्राद्वारे देण्यात येत आहेत. त्यातच रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीच्या दहा कोटी मात्रा २० मेपर्यंत भारतात येणार आहेत. - झायडस-कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लसीच्या आठ कोटी मात्रा जूनमध्ये उपलब्ध होणार आहेत. सीरम आणि भारत बायोटेक यांच्या ११० कोटी मात्राही लवकरच मिळतील, अशा विश्वास आहे. - मार्च, २०२२ पर्यंत देशात १२८ कोटी मात्रा असतील. फायझर, मॉडर्ना व जॉन्सन ॲॅण्ड जॉन्सन यांच्या लसीही येऊ घातल्या     आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर