CoronaVaccine : कर्मचाऱ्यांसाठी लस खरेदीचा कंपन्यांचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 05:13 AM2021-01-20T05:13:06+5:302021-01-20T05:13:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. 

CoronaVaccine: Companies consider buying vaccines for employees | CoronaVaccine : कर्मचाऱ्यांसाठी लस खरेदीचा कंपन्यांचा विचार

CoronaVaccine : कर्मचाऱ्यांसाठी लस खरेदीचा कंपन्यांचा विचार

Next

नवी दिल्ली : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ प्रतिरोधक लस खरेदी करण्याचा विचार अनेक भारतीय कंपन्या करीत आहेत, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. लसीची व्यावसायिक उपलब्धता होताच या कंपन्या लस खरेदी करू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. 

सूत्रांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहीम सुरू होताच आपल्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची चाचपणी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर,  महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयटीसी या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्या स्वखर्चाने लस खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांना देणार असल्याचे समजते. 

आयटीसीच्या एचआर विभागाचे प्रमुख अमिताव मुखर्जी यांनी सांगितले की, आम्ही लस उत्पादकांशी संपर्क साधला असून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. 

Web Title: CoronaVaccine: Companies consider buying vaccines for employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.