शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कोरोना स्थिती गंभीर... इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाहिजे, माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 11:26 IST

देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही.

ठळक मुद्देदेशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून रुग्णालये रुग्णांच्या संख्येनं भरली आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन, रेमेडीसीवीर आणि वैद्यकीय स्टाफची कमतरता जाणवत आहे. या संकटाशी देश धैर्याने सामना करत आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळी हतबल झाल्याचं पाहायाल मिळत आहे. विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही ट्विटरवरुन मदत मागावी लागली, एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. 

देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही. त्यामुळे, स्थानिक नेतेमंडळींशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, नेतेमंडळींनाही मदत शक्य होत नाही. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सर्वांसाठी खुलं केलंय. लोकांच्या मदतीसाठीचं ट्विट ते आपल्या अकाऊंटवरुन करत आहेत.  या संकटाच्या वेळी मी जितके शक्य होईल तितके मदत करण्यास सक्षम होऊ इच्छित आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीला कोविड विरूद्ध लढा देत असताना काय करावे लागते हे मी जवळून अनुभवलंय. त्यामुळे मी माझ्या ट्वटर अकाऊंटचा इन्बॉक्स उघडला आहे. येथे माझ्याकडे मदतीची विनंती करणाऱ्या युजर्संची हाक मी ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करणार आहे. ज्यामुळे, रुग्णांना मदत मिळण्यास मदत होईल, असे ट्विट ओमर अब्दुला यांनी केलंय. अब्दुल्ला यांच्या या टविटनंतर लगोलग मदतीचे अनेक ट्विट प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या ट्विटला मदत मिळाली त्या ट्विटचे आभारही ओमर अब्दुल्ला यांच्याकडून मानले जात आहेत.   

अब्दुल्ला यांच्याकडे मदतीसाठी अनेकांचे मेसेजेस येत आहेत. त्यापैकी, गौर सिटी नोएडा येथील एका युवकाच्या मामांना इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरची गरज आहे. कोविड पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णासाठी डॉक्टर उपलब्ध होतील का? असा प्रश्न अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन विचारला होता. तसेच, संबंधित व्यक्तीचा नंबरही शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातच पीडित रुग्णास मदत मिळाली आहे. त्यानंतरही, अब्दुल्ला यांनी मदत मिळाल्याचे कळवत आभार व्यक्त केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmar Abdullahउमर अब्दुल्लाTwitterट्विटर