शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

Corona virus : लसीकरण होईपर्यंत आपण 'न्यु नॉर्मल' आयुष्य जगु शकणार नाही: डॉ. रमण गंगाखेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:48 IST

आपल्याकडे सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही.

 

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्याकडे सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण न्यु नॉर्मल आयुष्य जगु शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत सांगितले.

-----------देशातील सध्याच्या कोरोनाच्या स्थितीबाबत काय सांगाल? दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?- देशात लॉकडाऊनमध्ये लोकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे आपली पहिली लाट अजूनही संपलेली नाही. जोपर्यंत ती संपत नाही, तोपर्यंत दुसºया लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. दुसरी लाट दिसत नसली तरी वेगवेगळ््या शहरांमध्ये वेगवेगळ््या वेळेत ही लाट येऊ शकते. नागरिकांनी दक्षता घेतली तर कदाचित आपण दुसºया लाटेला रोखु शकु. इतर देशांमध्ये जो परिणाम दिसतोय तो आपल्या देशात दिसणार नाही.

---------

जगभरात सुरू असलेल्या लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?- जगात यापुर्वीही कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारताता आठ लसी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने लसीची परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक असली तरी चालेल, असे म्हटले होते. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाºया स्पाईक प्रोटिनचा वापर करण्यात आला आहे. भारतातही या प्रोटिनचा वापर झाल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.---------------लसीचा एक डोस घेतल्यानंतर हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?- चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासिबो (अपरिणामकारक लससदृश द्रवपदार्थ) दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासिबो दिला ते पाहावे लागेल. तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. एकच डोस घेऊन जर आपण दक्षता घेतली नाही तर ते चुकीचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.-----------------कोरोनाला रोखण्यासाठी भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?- काही अभ्यासांनुसार ५५ ते ८० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला हर्ड इम्युनिटी म्हणता येईल. आपल्याकडे सप्टेंबरमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे. आता हे प्रमाण किती असेल, हे आताच सांगता येणार नाही. पण आपण निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार लसीकरण करण्यासाठी जुन-जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत २५ कोटींचा आकडा काहीप्रमाणात वाढलेला असेल. त्यावेळी हर्ड इम्युनिटीचा अंदाज बांधता येईल. त्यानुसार पुढील लसीकरण करावे लागेल.  --------------आपले आयुष्य ‘न्यु नॉर्मल’ कधी होईल?- आपण लस घेतली म्हणजे सुरक्षित नाही. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर एक महिना होत नाही तोपर्यंत आपल्याला मास्क, शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता या नियमांचे पालन करून जगणे आवश्यकच आहे. पुर्ण लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यु नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही.--------------गर्दी वाढूनही रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याने हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे का, याविषयी बोलताना ते म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही इथपर्यत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय. काही देशांतील परिस्थितीकडे पाहून असे वक्तव्य काहींनी केले असेल. त्याच्याशी आपली तुलना करणे योग्य नाही. आपल्याकडे अजून पहिली लाटच संपलेली नाही. अशा परिस्थितीत लस न देणे, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल.---------------जोखीम घ्यायला हवीमानवी चाचण्यांदरम्यान देण्यात आलेल्या लसींचा दुष्परिणाम जास्त असता तर तो पहिल्या दोन महिन्यांमध्ये दिसला असता. त्यामुळे याचा फार मोठा दुष्परिणाम होईल, अशी भिती मनात ठेऊ नये. काही दुष्परिणाम लसीकरणानंतर दीड वर्षानंतरही दिसू शकतात. पण याकडे आपण फायद्याच्या दृष्टीने पाहायला हवे. कारण ९५ टक्के लोकांमध्ये आता दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्यामुळे थोडी जोखीम उचलायला हरकत नाही.  --------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीय