शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

coronavirus : देशात कोरोनाचे थैमान वाढले, अनेक श्रीमंत भारतीय दहापट विमानभाडे देऊन परदेशात पळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 15:05 IST

corona virus in India : देशामध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो धनिक लोक देश सोडून कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या देशांच्या दिशेने धाव घेत आहेत.

मुंबई - देशामध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो धनिक लोक देश सोडून कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या देशांच्या दिशेने धाव घेत आहेत. देशाबाहेर जात असलेल्या भारतीयांकडूनसंयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे भारतातूनसंयुक्त अरब अमिरातींकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकीटदरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यूएईकडे जाणाऱ्या खाजगी विमानांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ( Spread of coronavirus  in india, many rich Indians fled abroad paying ten times the fare)

यूएईला जात असलेली विमानसेवा बंद होण्यापूर्वी येथे पोहोचण्यासाठी लोकांनी धावपळ सुरू केलेली आहे. दरम्यान, भारतात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यानंतर लोकांनी यूएईच्या दिशेने सुरू केलेले पलायन यामुळे यूएईने रविवारपासून भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

वृत्तसंस्थांनी केलेल्या दाव्यानुसार यूएईमधून भारताकडे येणारा विमान मार्ग सर्वाधिक वाहतूक असलेल्या विमानमार्गांपैकी एक आहे. विमानांच्या तिकिटांची तुलना करणाऱ्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार मुंबईतून दुबईला जाणाऱ्या कमर्शियल फ्लाइटच्या तिकिटाचे दर हे ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सर्वसामान्य दरांपेक्षा हे दर दहा पटींनी अधिक आहेत. तर दिल्लीतून दुबईला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर हे ५० हजारांवर पोहोचले आहेत. हे दर नियमित दरांपेक्षा पाच पट अधिक आहेत. मात्र निर्बंधांची घोषणा करण्यात आल्यानंतर रविवारपासून कुठल्याही विमानाचे तिकीट उपलब्ध नाही आहे. 

दरम्यान, खाजगी विमानांसाठीची मागणीही वाढली आहे. मुंबईतून दुबईला जाणाऱ्या १३ सिटर विमानाचा खर्च ३८ हजार डॉलर आहे. तर सिटर विमानासाठीचा खर्च ३८ हजार डॉलर एवढा आहे. यूएई आणि भारतामध्ये गेल्या आठवड्यात ३०० विमान फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, भारत आणि अन्य देशांमधून यूएईत येणाऱ्या लोकांना १४ दिवस क्वारेंटाइन राहावे लागेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती