Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 03:20 PM2022-01-08T15:20:54+5:302022-01-08T15:21:13+5:30

आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Corona Virus Omicron variant new symptoms sweating muscles pain cold and fever how to identify | Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटची लागण झालेल्या लोकांमध्ये विविध प्रकारची नवीन लक्षणे दिसू लागली आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे लोकांना सर्दी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत होता. मात्र आता रात्री अतिसार, मळमळ आणि घामाचा त्रासही होत आहे. ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये मसल्स पेन, उलट्या होणे आणि त्वचेवर पुरळ येण्याची लक्षणेही दिसत आहेत. ओमायक्रॉनची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये तर रात्रीच्या वेळी थंडीतही तीव्र घाम येताना दिसत आहे.(Omicron Symptoms)

आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तिसरी लाट चिंताजनक - 
कोरोना विषाणूची तिसरी लाट वेगाने पसरताना दिसत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट जुन्या व्हेरियंटच्या तुलनेत पाचपट वेगाने पसरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तिसऱ्या लाटेचा उच्चांक येईल, तेव्हा एका दिवसात दुसऱ्या लाटेपेक्षा चारपट अधिक रुग्ण समोर येऊ शकतात.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची लक्षणं - 
देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तिसऱ्या लाटेत, संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये जुण्या लक्षणांव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी घाम येणे, मसल्स पेन, अतिसार, मळमळ, डोकेदुखी आणि नाक वाहणे ही समस्या दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, अशा स्थितीत आपल्याला यांपैकी कुठलेही लक्षण दिसून येत असेल, तरीही तत्काळ आपली टेस्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Corona Virus Omicron variant new symptoms sweating muscles pain cold and fever how to identify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.