शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:15 IST

Corona Virus : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होणं ही याची प्रमुख कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणं सौम्य असतात आणि रुग्ण घरीच बरे होत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना खबरदारीची आणि रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक संसाधनांची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे, जिथे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रसारख्या मोठ्या शहरांमध्येही नवीन रुग्ण वाढत आहेत, ज्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

"परिस्थिती नियंत्रणात, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक”

NB.1.8.1 आणि LF.7 सारखे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत, परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारतीय आरोग्य संस्थांनुसार, हे व्हेरिएंट मागील ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर नाहीत. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेलया माहितीनुसार "२०२३ मध्ये दिसणारा नवीन व्हेरिएंट JN.1 आता जागतिक स्तरावर प्रमुख आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे."

कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय

आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्याचा, सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे.  ज्या लोकांनी बराच काळ बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी लस घेण्याचा विचार करावा असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. DGHS, NCDC आणि ICMR सारख्या संस्था सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नवीन व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यासाठी टेस्ट आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत